India Tour of Australia: मैदानाच्या मध्यमागातील खेळपट्टीवर दोन दिवसांच्या सराव सामन्यातून आम्हाला अपेक्षित असलेला सराव करता आला असा विश्वास अभिषेक नायर आणि मॉर्ने मॉर्कल या भारतीय संघ व्यवस्थापनातील प्रशिक्षकांनी व्यक्त केला.
भारतीय खेळाडूंची परस्परांमध्ये विभागणी करून दोन संघ तयार करण्यात आले होते. प्रत्यक्ष सामन्यासारखी स्थिती निर्माण करणारा हा सामना होता. मैदानाच्या मध्यभागील खेळपट्टीवर हा सामना झाल्यामुळे येथील परिस्थिती आणि वारावरणाशी खेळाडूंना मिळते जुळते घेत आले, असे या प्रशिक्षकांनी म्हटले.