Team India coaching Staff : शेवटी गौतम गंभीरने त्याची 'माणसं' भरली; IND vs SL दौऱ्याबाबत मोठी अपडेट्स

Head Coach Gautam Gambhir coaching staff of Indian team- भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाचा पहिला दौरा श्रीलंका असणार आहे. त्यासाठी सपोर्ट स्टाफमध्येही गंभीरची माणसं दिसतील
coaching staff of Indian team for SL tour
coaching staff of Indian team for SL toursakal
Updated on

coaching staff of Indian team for SL tour : भारतीय संघ २२ जुलै रोजी श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. ३ ट्वेंटी-२० व ३ वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची परवाच घोषणा करण्यात आली आणि त्यानंतर आता गौतम गंभीरच्या ( Gautam Gambhir) सपोर्ट स्टाफची नावं समोर येत आहेत. सुरुवातीला हाती आलेल्या वृत्तानुसार BCCI ने सपोर्ट स्टाफसाठी गौतम गंभीरने सुचवलेल्या नावावंवर फुली मारली होती. पण, गंभीरला अखेर आपली माणसं सपोर्ट स्टाफमध्ये घेण्यात यश आल्याचे ताजे वृत्त आहे.

श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफची अधिकृत घोषणा BCCI ने केली नसली तरी, भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू अभिषेक नायर ( Abhishek Nayar) आणि माजी डच आंतरराष्ट्रीय खेळाडू रायन टेन डोईशेट ( Ryan ten Doeschate) हे भारतीय संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये सामील होणार आहेत. क्रिकबझने हे वृत्त दिले आहे. नायर आणि डोईशेट हे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या सपोर्ट स्टाफसोबत जोडले गेले आहेत. नवीन मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्या सपोर्ट स्टाफमध्ये क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी पी दिलीप यांना कायम ठेवले गेले आहे.

coaching staff of Indian team for SL tour
Narendra Bunde : टीम इंडिया २०२७ मध्येही विश्‍वचषक जिंकणार! प्रसिद्ध ज्योतिषी व अंकशास्त्रज्ञ नरेंद्र बुंदे यांची भविष्यवाणी

नायर आणि टेन डोईशेट या दोघांची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन गोलंदाजी प्रशिक्षकाच्या शर्यतीत मॉर्न मॉर्केल हा एक मजबूत उमेदवार आहे आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज ही भूमिका स्वीकारण्याची शक्यता दाट आहे. या तिघांनी यापूर्वी गंभीरसोबत इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील KKRमध्ये काम केले आहे. मॉर्केलने दोन वर्षे लखनऊ सुपर जायंट्समध्ये गंभीरसोबत काम केले.

भारतीय संघ सोमवारी दुपारी १ वाजता मुंबईहून कोलंबोला चार्टर्ड फ्लाइटने रवाना होणार आहे. त्याआधी बीसीसीआय गंभीरची नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून औपचारिक घोषणा करतील. २२ जुलै रोजी पत्रकार परिषद होणार आहे. त्यावेळी नवनियुक्त ट्वेंटी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव उपस्थित राहिल. २७ जुलैपासून ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे.

coaching staff of Indian team for SL tour
पाकिस्तानी खेळाडूंनी कार्टून'गिरी बंद करावी! Mohammed Shami फुल्ल मूडमध्ये, माजी कर्णधारचा घेतला समाचार

भारताचा वन डे संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), शुभमन गिल ( उप कर्णधार), विराट कोहली, लोकेश राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलिल अहमद, हर्षित राणा.

भारताचा ट्वेंटी-२० संघ - सूर्यकुमार यादव ( कर्णधार), शुभमन गिल ( उप कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलिल अहमद, मोहम्मद सिराज.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com