Will Pucovski: १३ वेळा डोक्याला मार, भारताविरुद्ध पदार्पण; पण २६ व्या वर्षी ऑस्ट्रेलियन फलंदाजाचा निवृत्तीचा निर्णय

Will Pucovski Retire: ऑस्ट्रेलियाचा फलंदाज विल पुकोव्स्कीच्या डोक्याला तब्बल १३ वेळा मार लागला आणि आज अखेर त्याला कारकीर्दित थांबण्याचा निर्णय घ्यावा लागला.
Will Pucovski
Will Pucovskiesakal
Updated on

Australian batsman Will Pucovski Retire: ऑस्ट्रेलियन क्रिकेटर विल पुकोव्स्कीच्या कारकीर्दीला दुर्दैवीरित्या ब्रेक लागला. विलला वैद्यकीय कारणांमुळे व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी लागली आहे. फॉक्स स्पोर्ट्समधील एका अहवालानुसार वैद्यकीय तज्ञांच्या समितीच्या शिफारशीनंतर २६ वर्षीय खेळाडू क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. विलने भारताविरुद्ध एकमेव कसोटी मॅच खेळली होती. क्रिकेट कारकीर्दित त्याच्या डोक्याला तब्बल १३ वेळा चेंडू आदळला आहे.

पुकोव्स्कीला त्याच्या संपूर्ण कारकीर्दित डोक्याला अनेक दुखापत झाल्या आहेत. मार्च २०२४ मध्ये झालेली दुखापत अतिशय गंभीर होती. या वारंवार झालेल्या दुखापतींमुळे त्याच्या तब्येतीवर परिणाम झाला आणि त्याने क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. त्याच्या डोक्याला झालेल्या काही दुखापती खऱ्या आघात नसून, त्याने घेतलेला तणाव त्याच्या या परिस्थितीला जबाबदार आहे, असे २०२२ मध्ये केलेल्या वैद्यकीय मूल्यांकनात आढळून आले. मानसिक तणावामुळे त्याच्या कामगिरीवरही परिणाम झालेला पाहायला मिळाला.

मार्च २०२४ मध्ये रिली मेरेडिथच्या गोलंदाजीवर शेफिल्ड शिल्ड स्पर्धेत त्याला दुखापत झाली होती आणि त्याला संपूर्ण हंगामातून माघार घ्यावी लागली. त्यामुळेच २०२४ च्या इंग्लिश क्लब लिसेस्टरशायर विरुद्धचा करारही त्याला गमवावा लागला.

त्यायने ३६ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४५.१९च्या सरासरीने २३५० धावा केल्या आहेत आणि त्यात सात शतकांचा समावेश होता. तो ऑस्ट्रेलियाकडून एकमेव कसोटी ( वि. भारत, २०२०-२१) सामना खेळला आणि त्यात त्याने ६२ व १० धावा केल्या.

will pucovski
will pucovskiesakal

सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंक्तित स्थान

त्याने व्हिक्टोरियासाठी १९ वर्षांखालील राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये चार शतके झळकावली आणि त्यामुळे त्याला जानेवारी २०१७ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या लिस्ट अ दौऱ्यासाठी पदार्पणाची संधी मिळाली. त्याच मोसमात त्याने शेफिल्ड शील्ड पदार्पण केले. २०१८-१९ च्या पहिल्या शील्ड गेममध्ये तो डॉन ब्रॅडमन, इयान चॅपेल, क्लेम हिल, डॅरेन लेहमन, नॉर्म ओ'नील, रिकी पॉन्टिंग, पॉल शेहान आणि डग वॉल्टर्स यांच्यानंतर शेफील्ड शिल्डमध्ये द्विशतक करणारा आठवा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला. वयाच्या २१व्या वर्षी त्याने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध WACA येथे २४३ धावा केल्या. पण त्या सामन्यात त्याच्या मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवल्या आणि त्याला खेळातून सहा आठवड्यांचा ब्रेक घ्यावा लागला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.