Shashi Tharoor T20 WC 2024 : माझा मतदारसंघ करणार वर्ल्डकपमध्ये प्रतिनिधित्व.... शशी थरूर भारतीय संघाची घोषणा होताच हे काय म्हणाले?

Shashi Tharoor
Shashi Tharoor T20 WC 2024 esakal
Updated on

Shashi Tharoor T20 WC 2024 : बीसीसीआयने टी 20 वर्ल्डकप 2024 साठी भारतीय संघाची घोषणा केली. त्यानंतर काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांना चांगलाच आनंद झाला. त्यांनी ट्विट करून निवडसमितीचे अभिनंदन केले. याचबरोबर त्यांनी माझा मतदारसंघ अखेर वर्ल्डकपमध्ये प्रतिनिधित्व करणार असा देखील उल्लेख केला. शशी थरूर हे केरळच्या तिरूवअनंतपुरम मतदार संघाते खासदार आहेत.

Shashi Tharoor
T20 World Cup: "वर्ल्ड कपमध्ये घ्यायला पाहिजे होतं राव !"; सुनील अण्णाच्या जावयासाठी रितेश देशमुखची बॅटिंग, झाला ट्रोल

संघात निवडला गेलेला संजू सॅमसन देखील तिरूवअनंतपुरमचाच राहणारा आहे. त्याला आयपीएलमधील धडाकेबाज कामगिरीनंतर बीसीसीआयच्या निवडसमितीने अमेरिका आणि वेस्ट इंडीज येथे होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघात स्थान दिलं आहे.

यानंतर शशी थरूर यांनी ट्विट केलं की, 'टी20 वर्ल्डकप 2024 साठी जबरदस्त संघ निवडल्याबद्दल बीसीसीआयच्या निवडसमितीचं अभिनंदन. अखेर माझ्या मतदार संघाला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये प्रतिनिधित्व मिळालं याचा आनंद आहे. संजू सॅमसनला अखेर संधी मिळाली. हा संघ नक्की ट्रॉफी परत आणणार.'

Shashi Tharoor
T20 WC 2024 Team India Squad : बीसीसीआय अजूनही संघात करून शकते बदल; जाणून घ्या आयसीसीच्या खास नियमाबद्दल

काँग्रेसचे 68 वर्षाचे शशी थरूर हे अनेक दिवसांपासून संजू सॅमसनला भारतीय संघात स्थान मिळावं यासाठी बोलत होते. त्याला गेल्या वर्षीच्या वनडे वर्ल्डकपमधून वगळण्यात आलं होतं. मात्र आता टी 20 वर्ल्डकपसाठी त्याची संघात दुसरा विकेटकिपर म्हणून निवड झाली आहे. त्याने यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थानला पाईंट टेबलमध्ये टॉपवर नेऊन ठेवलं आहे. त्याने 385 धावा केल्या आहेत.

29 वर्षाच्या संजू सॅमसननं आतापर्यंत 25 टी 20 सामने खेळले आहेत. त्याने भारताकडून टी 20 क्रिकेटमध्ये 2015 मध्ये पदार्पण केलं होतं.

(Cricket Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.