काऊंटी अजिंक्यपद क्रिकेट ( County Championship ) स्पर्धेत बुधवारी विक्रमी भागीदारी पाहायला मिळाली. लँकशायर विरुद्ध डरहॅम यांच्यातल्या सामन्यात डेव्हिड वेडिंगहॅम आणि कॉलिन एकर्मन यांनी विक्रमी भागीदारी केली. या दोघांच्या खेळीच्या जोरावर डरहॅम संघाने मजबूत आघाडी मिळवली आणि विजयासाठी आता त्यांना ६ विकेट्सची गरज आहे.
लँकशायर क्लबने पहिल्या डावात २२८ धावा केल्या. हॅटी हर्स्टने सर्वाधिक ९० धावा केल्या आणि त्यानंतर जोश बोहानन ( ४६) वगळल्यास अन्य फलंदाजांनी निराश केले. डरहॅमच्या बेन रैनने ५, मॅथ्यू पॉट्सने ३ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या डरहॅमने ९९ धावांत ४ विकेट्स गमावल्या होत्या. सलामीवीर अॅलेक्स लीसने ४३ धावांचे योगदान दिले. पण, त्यानंतर डेव्हिड व कॉलिन ही जोडी मैदानावर उभी राहिली.
डेव्हिड व कॉलिन यांनी पाचव्या विकेटसाठी ४२५ धावांची भागीदारी केली, जी डरहॅमकडून काऊंटी क्रिकेटमधील सर्वोत्तम भागीदारी ठरली. कॉलिन ३५६ मिनिटे मैदानावर उभा राहिला आणि त्याने ३१२ चेंडूंत १७ चौकारांच्या मदतीने १८६ धावा केल्या. डेव्हिड मैदानावर उभा राहिला, परंतु त्याला अन्य फलंदाजांकडून अपेक्षित साथ नाही मिळाली. डेव्हिडची विकेट पडल्यावर डरहॅमने ९ बाद ५७३ धावांवर डाव घोषित केला.
डेव्हिडने ४८७ मिनिटे खेळपट्टीवर उभं राहून ३५९ चेंडूंत २७ चौकार व १ षटकारांसह २७९ धावांची खेळी केली. डरहॅकडून ही प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. त्यान मार्टिन लव्हचा २७३ धावांचा विक्रम मोडला. लँकशायरला दुसऱ्या डावात १५५ धावांत ४ धक्के बसले आहेत आणि अजूनही ते १९० धावांनी पिछाडीवर आहेत. जोश बोहानने ५६ धावांची खेळी केली. मॅटी हर्स्ट ४३ धावांवर खेळतोय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.