21 Six, 29 Four! निकोलस पूरनच्या वादळी खेळीला जेसन रॉयची साथ; पोलार्डच्या संघाचा दणदणीत विजय

CPL 2024 Nicholas Pooran : कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये काल चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. त्रिनबागो नाइट रायडर्सने रोमहर्षक विजयाची नोंद केली.
NICHOLAS POORAN
NICHOLAS POORANesakal
Updated on

St Kitts and Nevis Patriots vs Trinbago Knight Riders : कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( Caribbean Premier League) सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रीअट्स विरुद्ध त्रिनबागो नाइट रायडर्स सामन्यात चौकार - षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. पॅट्रीअट्सचा कर्णधार आंद्रे फ्लेचरच्या ९३ धावांच्या खेळीला नाइट रायडर्सच्या निकोलस पूरनने नाबाद ९३ धावांच्या खेळीतून उत्तर दिले. या सामन्यात तब्बल २१ षटकार व २९ चौकारांची फटकेबाजी पाहायला मिळाली आणि किरॉन पोलार्डच्या नाइट रायडर्सने दणदणीत विजय मिळवला.

प्रथम फलंदाजीला आलेल्या पॅट्रीअट्सने ४ बाद १९३ धावांचा डोंगर उभा केला. फ्लेचरने ६१ चेंडूंत ४ चौकार व ६ षटकारांसह ९३ धावांची खेळी केली. त्याला कायले मेयर्सने ३० चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह ६० धावा करून उत्तम साथ दिली. रिली रोसोवूनेही ११ चेंडूंत २० धावा केल्या. हे लक्ष्य पार करणे नाइट रायडर्ससाठी सोपे नव्हते.

प्रत्युत्तरात नाइट रायडर्सचा सलामीवीर किसी कार्टी १३ धावांवर माघारी परतला. पण, जेसन रॉय व पुरन यांनी दमदार फटकेबाजी केली. जेसन रॉयने ३४ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ६४ धावा कुटल्या. टीम डेव्हिड ( ९) अपयशी ठरल्याने नाइट रायडर्स अडचणीत आला होता. पण, पुरन मैदानावर उभा राहिला आणि त्याने ४३ चेंडूंत ६ चौकार व ७ षटकारांसह ९३ धावांची नाबाद खेळी केली. पोलार्डनेही १० धावा केल्या आणि रायडर्सने १८.३ षटकांत ३ बाद १९७ धावा करून सामना जिंकला.

निकोलस पुरनने ३६१ ट्वेंटी-२० सामन्यांत ८०३२ धावा केल्या आहेत. त्यात २ शतकं व ४७ अर्धशतकं आहेत. निकोलस जगभरातील विविध लीगमध्ये खेळतो आणि आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद, किंग्स इलेव्हन पंजाब या संघांकडून खेळला आहे.

NICHOLAS POORAN
IND vs BAN Records : भारत-बांगलादेश पहिल्या कसोटीत नोंदवले गेले ९ भारी विक्रम, R Ashwin ने वर्ल्ड रेकॉर्ड केला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.