Cricket Funny Catch Viral Video: क्रिकेटमध्ये अनेकदा आश्चर्यकारक घटना घडतात, ज्याची कल्पनाही कोणी केलेली नसते. अशीच एक घटना नुकतीच इंग्लंडमधील एका टी२० सामन्यात घडली आहे, ज्यात नॉन स्ट्रायकर मधे आल्याने स्ट्रायकरला असलेला फलंदाज झेलबाद झाला आहे.
मंगळवारी वॉर्मस्ली येथे सोमरसेट आणि यॉर्कशायर यांच्यात टी२० सामना झाला. या सामन्यात सोमरसेटचा नेड लिओनार्ड दुर्दैवीरित्या बाद झाला. ही घटना सोमरसेटच्या डावातील १९ व्या षटकात घडली. या षटकात यॉर्कशायरचा वेगवान गोलंदाज बेन क्लिफ गोलंदाजी करत होता.
त्याने या षटकातील दुसरा चेंडू फुल लेंथचा टाकला, ज्यावर नेद लिओनार्डने सरळ फटका मारला. मात्र, तो चेंडू नॉन स्ट्रायकरच्या खांद्याला लागून वर उडाला, त्यावेळी वेळेचं भान ठेवत गोलंदाज क्लिफने तो चेंडू झेलला.त्यामुळे लिओनार्डला झेलबाद होत माघारी परतावे लागले. लिओनार्ड एकही धाव करू शकला नाही. या घटनेचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
दरम्यान, नॉन-स्ट्रायकरच्या फलंदाजाला चेंडू लागून स्ट्राईकवर असलेला फलंदाज बाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही.
यापूर्वी 2006 मध्ये श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एक वनडे सामना मेलबर्नला झालेला, या सामन्यात अँड्र्यूज सायमंड्सने एक शॉट खेळलेला, ज्यावर चेंडू नॉन स्ट्रायकरला असलेल्या मायकल क्लार्कच्या शुजला लागून उडाला होता. त्यावेळी तिलकरत्ने दिलशानने मिड-ऑनला झेल घेतला होता.
दरम्यान, मंगळवारी झालेल्या सामन्यात सोमरसेटने 20 षटकात सर्वबाद 191 धावा केल्या होत्या. त्यानंतर झालेल्या 192 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यॉर्कशायरचा संघ 16.5 षटकातच 125 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे हा सामना सोमरसेटने 66 धावांनी विजय मिळवला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.