Cricket Viral Video: दोन ओव्हर अन् तब्बल 61 धावा...! क्रिकेटच्या सामन्यात घडला अविश्वसनीय पराक्रम

2 Overs 61 Runs: रविवारी क्रिकेटच्या एका सामन्यात दोन षटकात ६१ पेक्षाही अधिक धावा फटकावण्यात आल्याची घटना घडली आहे.
Austria vs Romania | Cricket
Austria vs Romania | CricketSakal
Updated on

2 overs 61 runs in Cricket match Video: क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, हे अनेकदा सिद्ध होताना दिसते. क्रिकेटच्या मैदानात काही अविश्वसनीय विक्रम होत असतात. असाच एक विक्रम रविवारी (१४ जुलै) रोमानिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या एका सामन्यात झाला. या सामन्यात अखेरच्या दोन षटकात ६५ अधिक धावा निघाल्या.

हा सामना युरोपियन क्रिकेट इंटरनॅशनल टी१० या स्पर्धेत बुखारेस्ट येथे झाला. या सामन्यात अखेरच्या दोन षटकात ऑस्ट्रियाला ६१ धावांची गरज होती. विशेष म्हणजे ऑस्ट्रियाने या धावा एक चेंडू राखून पूर्ण केल्या.

रोमानियाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना १० षटकात २ बाद १६७ धावा उभारल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रियाने ८ षटकात ३ बाद १०७ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रियाला अखेरच्या दोन षटकात विजयासाठी ६१ धावा हव्या होत्या, यावेळी कर्णधार आकिब इक्बाल ९ चेंडूत २२ धावांवर आणि इम्रान आसिफ ९ चेंडूत १४ धावांवर खेळत होते.

Austria vs Romania | Cricket
MS Dhoni Investment: 'कॅप्टन कूल' धोनीने 'या' कंपनीत केली 200 कोटींची गुंतवणूक; ओला-उबेरला देणार टक्कर

त्यावेळी ९ व्या षटकात रोमानियाकडून मनमीत कोली गोलंदाजीसाठी आला. त्याने या षटकात तब्बल ४१ धावा दिल्या. त्याने ४ चेंडू ज्यादाचे टाकले, त्यामुळे त्याचे हे षटक १० चेंडूंचे झाले होते. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर इम्रानने एकेरी धाव घेतली. त्यानंतर वाईड चेंडूवर चौकार गेला.

त्यानंतरच्या चेंडूवर आकिबने षटकार मारला. त्यानंतरच्या दोन चेंडूवरही चौकार आणि षटकार मारण्यात आला. यानंतरचा चेंडू मनमीतने नोबॉल टाकला, ज्यावरही आकिबने षटकार मारला. त्यानंतरचा चेंडूवर एकही धाव निघाली नाही. त्यानंतर पुन्हा नोबॉलवर षटकार आला आणि नंतरचा चेंडू वाईड पडला.

अखेर शेवटच्या अधिकृत चेंडूवर चौकार आला. असे मिळून एकूण ४१ धावा आल्या.

Austria vs Romania | Cricket
Paris Olympics : पॅरिस ऑलिंपिकसाठी भारताचा टेबल टेनिस संघ जर्मनीत; खेळाडूंपेक्षा सपोर्ट स्टाफची अधिक संख्या ठरला चर्चेचा विषय

त्यामुळे अखेरच्या षटकात २० धावांची गरज ऑस्ट्रियाला होती. यावेळी रोमानियाकडून या षटकात चमलका फर्नांडो गोलंदाजीला आला. त्याला पहिल्याच चेंडूवर इम्रानने षटकार मारला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक धाव निघाली. यानंतरच्या सलग तीन चेंडूंवर आकिबने तीन षटकार मारले. त्यामुळे ऑस्ट्रियाच्या ९.५ षटकात ३ बाद १७३ धावा झाल्या. हा सामना ऑस्ट्रियाने १ चेंडू राखून जिंकला. आकिब १९ चेंडूत ७२ धावांवर नाबाद राहिला.

तत्पुर्वी रोमानियाकडून मुहम्मद मोईजने १४ चेंडूत ४२ धावा फटकावल्या होत्या. तसेच एरियन स्टोलने ३९ चेंडूत १०४ धावा केल्या. त्यामुळे रोमानिया १६७ धावांपर्यंत पोहचले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.