DSP Mohammed Siraj: 'दबंग' मोहम्मद सिराज; पोलीस उपअधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला

DSP Mohammed Siraj भारताचा क्रिकेटपटू मोहम्मद सिराज याने शुक्रवारी पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) म्हणून पदभार स्वीकारला.
Mohammad Siraj in the DSP uniform
Mohammad Siraj in the DSP uniformesakal
Updated on

Mohammed Siraj to Duty as DSP at Telangana : भारताचा क्रिकेटपटू मोहम्मद सिराज याने शुक्रवारी तेलंगणाचे पोलीस महासंचालक (डीजीपी) यांना अहवाल दिल्यानंतर अधिकृतपणे पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) म्हणून पदभार स्वीकारला. मोहम्मद सिराजसोबत खासदार एम. अनिल कुमार यादव, खासदार आणि TGMREIS चे अध्यक्ष मोहम्मद फहीमुद्दीन कुरेशी यावेळी होते. मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी भारताचा जलदगती गोलंदाज सिराजला प्रतिष्ठित गट-१ सरकारी नोकरी मिळेल, असे याआधी जाहीर केले होते. मोहम्मद सिराज आज कर्तव्यावर रुजू झाला.

भारताच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या संघाचा तो सदस्य होता. त्यानंतर हैदराबादमध्ये दाखल झाल्यावर त्याची जंगी मिरवणूक काढण्यात आली होती. ३० वर्षीय सिराजने २९ कसोटी, ४४ वन डे आणि १६ ट्वेंटी-२० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करताना १६३ आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी ( ६-१५) व वन डे ( ६-२१) फॉरमॅटमध्ये सहा विकेट्स ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे.

Mohammad Siraj in the DSP uniform
IND vs AUS : आपला Rohit Sharma नाही, तर त्यांचा...! ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, स्टार खेळाडू Border-Gavaskar Trophy ला मुकणार

हैदराबादमधील ऑटो रिक्षाचालकाच्या मुलाचा भारतीय संघापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. सातव्या इयत्तेपासून त्याने क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. २०१५ मध्ये त्याने पहिल्यांदा गोलंदाजी केली आणि २०१७ मध्ये त्याला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये २.६ कोटीचा करार मिळाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याला करारबद्ध केले. महिन्याभरात त्याने भारताकडून ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पदार्पण केले.

ऑस्ट्रेलिया मालिकेची तयारी..

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत मोहम्मद सिराजने ४ विकेट्स घेतल्या. आता भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज होतोय. सिराजला आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी या मालिकेत छाप पाडण्याची संधी आहे. मोहम्मद शमी दुखापतीतून पूर्णपणे न सावरल्यास शमीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर प्लेइंग इलेव्हनवर संधी मिळू शकते.

Mohammad Siraj in the DSP uniform
PAK vs ENG : इंग्लंडने इतिहास रचला, पाकिस्तानचा पार कचरा केला! Multan Test मध्ये विक्रमांचा पाऊस पडला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.