IPL 2025 Auction: महेंद्रसिंग धोनीला झारखंड उच्च न्यायालयाचा दणका, बजावले समन्स; जाणून घ्या नेमकं प्रकरण

MS Dhoni Summoned : चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला झारखंड उच्च न्यायालयाने समन्स बजावले आहे. त्याचा माजी बिझनेस पार्टनरने केला फसवणुकीचा आरोप.
MS Dhoni
MS Dhoni esakal
Updated on

Jharkhand High Court served notice to MS Dhoni: भारतीय संघाचा आणि चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला झारखंड उच्च न्यायालयाने समन्स बजावले आहे. माजी व्यावसायिक भागीदार मिहीर दिवाकर आणि सौम्या दास यांनी माजी कर्णधारावर फसवणूक केल्याचा आरोप केला आणि काउंटर केस दाखल केली आहे. दिवाकर व दास यांच्या अर्का स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक या नात्याने धोनीच्या नावाने भारतात आणि परदेशात क्रिकेट अकादमी स्थापन करण्यासाठी त्याच्याशी करार केला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.