IPL 2025 Retention Date, Time : महेंद्रसिंग धोनीने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये खेळणार असल्याचे अप्रत्यक्षपणे काल जाहीर केले. चेन्नई सुपर किंग्जच्या व्यवस्थापनाशी नियोजित बैठकीपूर्वीच धोनीने, खेळणे सुरू ठेवू इच्छित असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आयपीएलच्या पुढील हंगामात भारताच्या माजी कर्णधाराच्या सहभागाच्या आशा वाढल्या आहेत. रिटेन्शनची घोषणा करण्याची अंतिम मुदत जवळ आल्याने धोनीचे हे विधान महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत फ्रँचायझी त्याला लिलावापूर्वी अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवू शकते. ३१ ऑक्टोबरपर्यंत फ्रँचायझीला संघात कायम राखलेल्या खेळाडूंची यादी आयपीएलकडे सोपवायची आहे.