Sports Bulletin 5th Oct 2024 : मुंबईने २७ वर्षांनी जिंकला इराणी चषक ते भारतीय महिला संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील सेमी फायनलचे समीकरण, एका क्लिकवर

Irani Cup to T20I World Cup 2024 : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडाविश्वास आज बऱ्याच घडामोडी घडल्या. महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात टीम इंडियाला काल हार मानावी लागल्याने उपांत्य फेरीचे गणित बिघडल्यापासून ते मुंबईने इराणी चषक उंचावल्यापर्यंत.. आजच्या महत्त्वाच्या बातम्या...
Sports Bulletin
Sports Bulletin esakal
Updated on

Irani Cup to T20I World Cup 2024 :  राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडाविश्वास आज बऱ्याच घडामोडी घडल्या. महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात टीम इंडियाला काल हार मानावी लागल्याने उपांत्य फेरीचे गणित बिघडल्यापासून ते मुंबईने इराणी चषक उंचावल्यापर्यंत.. आजच्या महत्त्वाच्या बातम्या...

मुंबईने आज इतिहास रचला आहे. मुंबईने तब्बल २७ वर्षांनंनतर इराणी कपवर नाव कोरले आहे. शेष भारताविरूद्धचा हा सामना पाचव्या दिवशी ड्रॉ जाहीर करण्यात आला आणि पहिल्या डावातील आघाडीमुळे मुंबई संघ विजयी घोषित करण्यात आला. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा

मुंबईने पहिल्या डावात ५३७ धावांचा डोंगर उभा केला होता, परंतु शेष भारताकडून जोरदार प्रत्युत्तर मिळाले. अभिमन्यू ईश्वरनच्या शतकी खेळीने शेष भारताला ४१६ धावांपर्यंत पोहोचवले. मुंबईला दुसऱ्या डावात सारांश जैनने ईंगा दाखवला आणि ६ विकेट्स घेऊन कोंडीत पकडले. पण, तनुष कोटियन ( Tanush Kotian) पुन्हा एकदा संकटमोचक म्हणून मैदानावर उभा राहिला. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा

TANUSH KOTIAN
TANUSH KOTIANesakal

India vs Bangladesh 1st T20I : कसोटी मालिकेनंतर टीम इंडिया ट्वेंटी-२० मालिकेत बांगलादेशला नमवण्यासाठी सज्ज झाली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली युवा जोश असलेला भारतीय संघ उद्या बांगलादेशविरुद्ध मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. ग्वालियरच्या माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर ही मॅच होणार आहे. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा

IND vs NZ W
IND vs NZ Wesakal

India Semi-final scenario Women's T20 World Cup 2024  : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप विजयाचा निर्धार करून मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. पराभवामुळे टीम इंडियाचा मार्ग खडतर झाला आहे. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा

Inspirational : वडील एका खासगी कॉलेजमध्ये चतुर्थ कर्मचारी व आई घरोघरी स्वयंपाकाचे काम करते. घरात अठरा विश्वे दारिद्र्य व आर्थिक चणचण असताना अशा परिस्थितीत आईवडिलांनी आपल्या खेळाडू मुलीला प्रोत्साहन देऊन तिच्या ‘स्पोर्ट्स करिअर’ला आकार दिला. मुलीनेही आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला सुवर्णपदक मिळवून देत मायबापाच्या कष्टाचे चीज केले. प्रेरणादायी बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.