Captain David Warner BBL: ऑस्ट्रेलिया क्रिकेट वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. डेव्हिड वॉर्नर पुन्हा आता कर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे. चेंडू कुडतडल्या प्रकरणात दोषी आढळल्यानंतर वॉर्नरवर नेतृत्व करण्यासाठी आजीवन बंदी घातली गेली होती. नुकतीच ही बंदी उठवण्यात आली आणि आज त्याच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडली. बिग बॅश लीगच्या आगामी पर्वात वॉर्नर हा सिडनी थंडर्स संघाचे नेतृत्व करणार आहे. BBL 14 साठी वॉर्नर आमचा कर्णधार असेल, हे सिडनी थंडर्सने जाहीर केले.