क्रिकेट
मी पूर्ण प्रयत्न केले, तरी तू जाण्याचा निर्णय घेतलास...! Rishabh Pant ने दिल्लीची साथ सोडल्यानंतर मालक पार्थ जिंदाल स्पष्टच बोलले
DC Parth Jindal : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ चे मेगा ऑक्शन पार पडले आणि ऋषभ पंत हा सर्वाधिक २७ कोटी रक्कम घेऊन लखनौ सुपर जायंट्सच्या ताफ्यात दाखल झाला.
Parth Jindal react on Rishabh Pant decision- इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये सर्वच संघांमध्ये बरेच बदल पाहायला मिळणार आहे. पंजाब किंग्सने संपूर्ण संघ नव्याने तयार केला आहे. दिल्ली कॅपिटल्सने जेव्हा ऋषभ पंतला रिलीज करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. गेली ९ वर्ष ऋषभ या संघाकडून खेळला, मागील काही वर्ष तो संघाचा कर्णधारही होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या यष्टिरक्षक-फलंदाजाला रिलीज करण्यामागे अनेक कारणं सांगितली जात होती. पण, खरं काय ते कुणालाच कळले नाही.