IPL 2025: गांगुलीला कोच म्हणून केलं रिजेक्ट, दिल्लीचा शोध 'गंभीर'साठी?

Delhi Capitals Head Coach: रिकी पाँटिंग दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक म्हणून पायउतार झाला आहे, त्यामुळे हे पद सध्या रिक्त आहे.
Sourav Ganguly
Sourav GangulyX/DelhiCapitals
Updated on

Delhi Capitals does not want Sourav Ganguly as new head coach: इंडियन प्रीमियर लीगमधील संघ दिल्ली कॅपिटल्सने १८ व्या हंगामाआधी होणाऱ्या मेगा ऑक्शनपूर्वी मोठा निर्णय घेतला. दिल्लीने मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगबरोबरचे नाते तोडले आहे. त्यामुळे दिल्ली संघात मुख्य प्रशिक्षक पद रिकामे झाले आहे.

पाँटिंग गेली ७ वर्षे या संघाचा मुख्य प्रशिक्षक होता. मात्र या ७ वर्षांच्या कार्यकाळानंतर त्याचा या संघाबरोबरचा प्रशिक्षक म्हणून प्रवास थांबला आहे.

यादरम्यान, दिल्लीचा क्रिकेट संचालक सौरव गांगुलीला हे पद मिळू शकते अशी चर्चा होती. गांगुलीनेही बंगाली वृत्तपत्राला दिलेल्या एका मुलाखतीत हे पद स्विकारण्याची इच्छा असल्याचे सुचक वक्तव्य केले होते.

Sourav Ganguly
Delhi Capitals: रिकी पाँटिंग अन् दिल्लीचे मार्ग झाले वेगळे, IPL 2025 साठी संघाला मिळणार नवा कोच

मात्र, आता अशी माहिती मिळत आहे की दिल्ली कॅपिटल्स त्याचा मुख्य प्रशिक्षकपदासाठी विचार करत नाहीये. न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार दिल्लीचा गांगुलीला क्रिकेट संचालक आणि प्रशिक्षक अशी दुहेरी जबाबदारी देण्याचा विचार नाही.

गांगुली केवळ आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सचाच नाही, तर या संघांच्या सिस्टर फ्रँचायझी दुबई कॅपिटल्स, प्रीटोरिया कॅपिटल्स यांचाही क्रिकेट संचालक आहे.

रिपोर्टनुसार एका सुत्राने सांगितले की 'गांगुलीच्या ताटात आधीच खुप गोष्टी आहेत. क्रिकेट संचालक म्हणून त्याला फ्रँचायझीसाठी बऱ्याच गोष्टींच्या योजना आखायच्या असतात.'

तसेच दिल्ली गौतम गंभीरप्रमाणे एखाद्या प्रशिक्षकाच्या शोधात आहे. गंभीरच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच आयपीएल २०२४ स्पर्धेचे विजेतेपद कोलकाता नाईट रायडर्सने मिळवले होते. यानंतर गंभीरला आता भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

Sourav Ganguly
Sourav Ganguly : 'आता मला कोणीही शिव्या देत नाही, मीच रोहितला...' सौरव गांगुलीचे धक्कादायक वक्तव्य

सुत्राने सांगितले की 'संघाला अत्यंत आक्रमकपणे नेतृत्व करणाऱ्या प्रशिक्षकाची गरज आहे. जसे गौतम गंभीर करतो. तो एक मार्गदर्शक म्हणून इतका यशस्वी झाला यात आश्चर्याची गोष्ट नाही. तो खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत कामगिरीबाबत माहिती ठेवतो.'

'व्यवस्थापनाला प्रशिक्षकपदासाठी कोणतीही अस्थायी गोष्टी नको आहेत, कारण मेगा ऑक्शननंतर लगेच नवीन चक्र चालू होईल.'

दिल्लीबद्दल सांगायचे झाले, तर ते पहिल्या हंगामापासून आयपीएलमध्ये खेळत होते. दिल्ली फ्रँचायझीचे नाव पूर्वी दिल्ली डेअरडेविल्स होते, जे 2019 मध्ये बदलण्यात आले आणि दिल्ली कॅपिटल्स करण्यात आले. या संघाला आत्तापर्यंत १७ वर्षात एकदाही आयपीएलचे विजेतेपद जिंकता आलेले नाही.

Chitra smaran:

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.