Ind vs Eng 5th Test : पडिक्कलला कशामुळे मिळाली संधी? कर्णधार रोहितने सांगितलं मोठं कारण; 'काल संध्याकाळी रजत...'

India vs England 5th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना धरमशाला येथील स्टेडियममध्ये खेळला जात आहे, ज्यामध्ये इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Devdutt Padikkal makes his debut as Rajat Patidar got injured last evening says Rohit Sharma
Devdutt Padikkal makes his debut as Rajat Patidar got injured last evening says Rohit Sharma
Updated on

या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये दोन मोठे बदल पाहायला मिळाले आहेत, ज्यामध्ये देवदत्त पडिकलला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. या फॉरमॅटमध्ये खेळणारा तो भारतीय संघाचा 314 वा खेळाडू ठरला आहे.

Devdutt Padikkal makes his debut as Rajat Patidar got injured last evening says Rohit Sharma
Devdutt Padikkal Test Debut : शेवटच्या कसोटीत देवदत्त पडिक्कलचे पदार्पण! कर्णधार रोहितने संघात केले दोन मोठे बदल

नाणेफेक हारल्यानंतर कर्णधार रोहित म्हणाला की, संघात दोन बदल आहेत. जसप्रीत बुमराहचे पुनरागमन झाले आहे. आकाश दीपच्या जागी त्याचा समावेश करण्यात आला आहे. आणि त्याचवेळी बुधवारी संध्याकाळी सराव करताना रजतला दुखापत झाली. त्यामुळे पडिक्कलला संधी मिळाली आहे.

Devdutt Padikkal makes his debut as Rajat Patidar got injured last evening says Rohit Sharma
Ind vs Eng 5th Weather : धरमशाला कसोटीत पहिल्या दिवशी पावसाचा राडा? जाणून घ्या कसे असेल हवामान

रजतने या मालिकेत टीम इंडियासाठी तीन सामने खेळले आहेत. मात्र या काळात त्याला विशेष काही करता आले नाही. आता तो दुखापतीमुळे पाचव्या सामन्यातून बाहेर आहे. बुधवारी सरावादरम्यान पाटीदार जखमी झाला. त्याच्या डाव्या घोट्याला दुखापत झाली आणि त्यामुळे सकाळीही त्याला वेदना होत होत्या. रजतची प्रकृती लक्षात घेऊन त्याला ब्रेक देण्यात आला. त्याच्या अनुपस्थितीत भारताने पडिक्कलचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे.

Devdutt Padikkal makes his debut as Rajat Patidar got injured last evening says Rohit Sharma
ICC Rankings : यशस्वी जैस्वालने रचला इतिहास! पहिल्यांदाच आयसीसी कसोटी क्रमवारीत केली 'ही' मोठी कामगिरी

देवदत्त पडिक्कलने त्याच्या शेवटच्या 10 प्रथम श्रेणी डावांमध्ये 30, 193, 42, 31, 103, 105, 65, 21, 151 आणि 36 धावा केल्या आहेत. या काळात देवदत्त पडिक्कलची फलंदाजीची सरासरी 77.7 आहे. देवदत्त पडिक्कलने त्याच्या शेवटच्या 10 प्रथम श्रेणी डावांमध्ये 4 शतके झळकावली आहेत, ज्यामध्ये 151 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

शेवटच्या कसोटी सामन्यात भारतीय संघ : यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, देवदत्त पडिक्कल, रवींद्र जडेजा, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()