Duleep Trophy: कॅप्टन Shreyas Iyer शुन्यावर गेला, देवदत्त पडिक्कल एकटा भिडला; तरीही संघ पिछाडीवर पडला

Duleep Trophy : पहिला सामना गमावल्यानंतर दुसऱ्याल सामन्यातही भारत-ड संघ पिछाडीवर आहे.
Devdutt Padikal
Devdutt Padikalesakal
Updated on

Devdutt Padikkal: दुलीप ट्रॉफीमध्ये दुसऱ्या फेरीत भारत-अ विरुद्ध भारत-ड संघात सामना सुरू आहे. या सामन्यात फलंदाजांना धावा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागल्याचे दिसले आहे.

या सामन्यात भारत-ड संघाचा कर्णधार श्रेयश अय्यरला शून्य धावेवरच परतावे लागले. परंतु देवदत्त पडिक्कलने १२४ चेंडूंमध्ये १४ षटकारांसह ९२ धावांची खेळी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तरीही भारत-ड संघाला सामन्यात आघाडी घेण्यात अपयश आले आहे.

दुलीप ट्रॉफीमधील पहिला सामना भारत-ड संघाने गमवला आहे, त्यामुळे दुसरा सामना जिंकणे त्यांच्यासाठी महत्वाचे आहे.

Devdutt Padikal
... त्यावर अवलंबून नाही! MS Dhoni आयपीएल खेळणार की नाही? CSK ने फैसलाच केला

भारत-अ संघाने प्रथम फलंदाजी करत सामन्याची सुरूवात केली. भारत-अ संघाचा अष्टपैलू खेळाडू शम्स मुलानीने १८७ चेंडूंमध्ये ८९ धावांची धमाकेदार खेळी केली. दरम्यान त्याने ८ चौकार व ४ षटकार ठोकले. त्याला तनुष कोटियनची साथ मिळाली. तनुषने फटकेबाजी करत ८० चेंडूत ५३ धावा केल्या.

या दोघांच्या कामगिरीच्या जोरावर भारत-अ संघाने पहिल्या डावात २९० धावा उभारल्या. ज्यामध्ये रियान परागने ३७ धावांचे योगदान दिले. भारत-ड संघाचा गोलंदाज हर्षित राणाला भारत-अ संघाचे ४ विकेट्स घेण्यात यश आले.

Devdutt Padikal
Duleep Trophy 2024 Video: श्रेयस अय्यर शायनिंग मारत आला अन् शुन्यावर आऊट झाला, संजू सॅमसनही स्वस्तात माघारी परतला

भारत-ड संघाच्या पहिल्या डावात देवदत्त पडिक्कलव्यतिरिक्त हर्षित राणाने गोलंदाजीप्रमाणे फलंदाजीमध्येही ३७ धावांचे योगदान दिले. त्या व्यतिरिक्त भारत-ड च्या कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळेच भारत-ड संघाचा पहिला डाव १८३ धावांवर आटपला. ज्यामध्ये खलील अहमद व अकिब खान यांना प्रत्येकी ३ तर एम प्रसिध, तनुष कोटियन, शम्स मुलानी यांना प्रत्येकी १ विकेट्स मिळाली.

सध्या भारत-अ संघाचा दुसरा डाव सुरू झाला असून त्यांनी सामन्यामध्ये १५९ धावांनी आघाडी घेतली आहे. सलामीवीर प्रथम सिंग आणि कर्णधार मयंक अगरवाल यांनी ८३ धावसंख्या उभारत चांगली सुरूवात केली आहे. भारत-ड संघाला जिंकण्यासाठी भारत-अ संघाचा डाव लवकर संपवून सामन्यात आघाडी घ्यावी लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()