MS Dhoni | Dhruv Jurel
MS Dhoni | Dhruv JurelSakal

Duleep Trophy: ध्रुव जुरेलचा भारी कारनामा! MS Dhoniच्या २० वर्षे जुन्या विक्रमाशी केली बरोबरी

Dhruv Jurel equals MS Dhoni record: दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धेतील पहिल्या फेरीत यष्टीरक्षक ध्रुव जुरेलने मोठा विक्रम केला आहे. त्याने धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
Published on

Duleep Trophy 2024, India A vs India B: दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धेच्या पहिल्या फेरीत इंडिया ए आणि इंडिया बी हे संघ आमने-सामने आहेत. बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात इंडिया ए संघाकडून खेळणाऱ्या यष्टीरक्षक ध्रुव जुरेलने एक मोठा कारनामा केला आहे.

या सामन्यात इंडिया बी संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना यष्टीरक्षण करणाऱ्या ध्रुव जुरेल सातत्याने व्यस्त राहिला. त्याच्या चांगल्या यष्टीरक्षणाचा फायदा इंडिया ए संघाच्या गोलंदाजांनाही झाला. त्याने या डावात तब्बल ७ झेल घेतले.

त्याने यष्टीमागे यशस्वी जयस्वाल, कर्णधार अभिमन्यू ईश्वरन, मुशीर खान, सर्फराज खान, नितीश कुमार रेड्डी, साई किशोर आणि नवदीप सैनी यांचे झेल घेतले. त्यामुळे तो दुलीप ट्रॉफीमध्ये एकाच डावात यष्टीरक्षक म्हणून ७ झेल घेणारा एमएस धोनीनंतरचा दुसराच खेळाडू ठरला.

MS Dhoni | Dhruv Jurel
Ruturaj Gaikwad च्या नेतृत्वाखालील संघाने श्रेयस अय्यरच्या टीमला नमवले; Duleep Trophy त महत्त्वाचे ६ गुण कमावले
Loading content, please wait...