KL Rahul प्रेमापोटी टीम इंडियाने दोन खेळाडूंना लटकवलं; ना रिलीज केलं ना टीम इंडियाकडून खेळण्याची संधी दिली

Irani Cup 2024: एकिकडे भारतीय क्रिकेट संघ बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे, तर दुसरीकडे भारतात देशांतर्गत स्पर्धाही सुरू आहे. अशात ज्या खळाडूंना भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाणार नाही त्यांना देशांतर्गत स्पर्धेसाठी मुक्त केले जाणार का असा प्रश्न आहे.
Dhruv Jurel | Sarfaraz Khan | KL Rahul
Dhruv Jurel | Sarfaraz Khan | KL RahulSakal
Updated on

India vs Bangladesh, 2nd Test: भारतीय क्रिकेट संघ सध्या बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेला १९ सप्टेंबरपासून सुरूवात झाली असून चेन्नईला झालेला पहिला सामना भारताने २८० धावांनी जिंकला. आता २७ सप्टेंबरपासून दुसरा कसोटी सामना कानपूर येथे खेळवला जाणार आहे.

दरम्यान ही मालिका एकीकडे सुरू असतानाच दुसरीकडे भारतात देशांतर्गत स्पर्धेतील सामनेही खेळले जात आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना ज्यादिवशी सुरू झाला, त्याच दिवशी दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धेच्या तिसऱ्या आणि अखेरच्या फेरीचे सामने सुरू झाले होते.

महत्त्वाचे म्हणजे अनेक खेळाडू दुलीप ट्रॉफीमधून भारतीय संघात निवड झाल्याने चेन्नईला आले. त्यातील बऱ्याच खेळाडूंना भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली, ज्यामध्ये केएल राहुल, शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, आकाश दीप, ऋषभ पंत यांचा समावेश होता.

Dhruv Jurel | Sarfaraz Khan | KL Rahul
ऋतुराज गायकवाड Vs Ajinkya Rahane! श्रेयस, इशान, शार्दूल, पृथ्वी हेही भिडणार; वाचा जबरदस्त सामना केव्हा कुठे रंगणार

पण यांच्याशिवाय सर्फराज खान, यश दयाल आणि ध्रुव जुरेल हे देखील दुलीप ट्रॉफीमध्ये खेळत होते, जर त्यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाणार नव्हती, तर त्यांना संघातून मुक्त केले असते, तर ते सर्वजण दुलीप ट्रॉफीच्या अखेरच्या सामन्यात खेळू शकले असते.

यापूर्वी फेब्रुवारी-मार्चमध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेदरम्यान केएल राहुल आणि ऋषभ पंत दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर असताना त्यांच्याजागेवर सर्फराज आणि जुरेल खेळले होते. मात्र आता केएल राहुल आणि पंत यांचं पुनरागमन झाल्याने सर्फराज आणि जुरेलला पुनरागमनासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागत आहे.

दरम्यान, आता ही चूक यंदा सुधारलेली दिसून आली आहे. १ ऑक्टोबरपासून इराणी कप स्पर्धा सुरू होणार आहे. त्यामुळे भारत आणि बांगलादेश यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी जर सर्फराज, यश दयाल आणि ध्रुव जुरेल यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही, तर त्यांना भारतीय संघातून मुक्त करण्यात येणार आहे, जेणेकरून त्यांना इराणी कप स्पर्धेत खेळता येणार आहे.

Dhruv Jurel | Sarfaraz Khan | KL Rahul
Irani Cup 2024: अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपदाची जबाबदारी; शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यरलाही मिळणार संघात संधी

सर्फराज इराणी कपमध्ये मुंबईकडून, तर जुरेल आणि दयाल शेष भारत संघाकडून खेळताना दिसू शकतात. इराणी कपमधील सामना शेष भारत आणि रणजी ट्रॉफी २०२३-२४ विजेता मुंबई संघ यांच्यात १ ते ५ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.

इराणी कप सामन्यासाठी संघ -

मुंबईचा संघ - अजिंक्य रहाणे ( कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, मुशीर खान, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सुर्यांश शेडगे, हार्दिक तामोरे, सिद्धांत अद्धातराव, शम्स मुलानी, तनुष कोटियान, हिमांशू सिंग, शार्दूल ठाकूर, मोहित अवस्थी, मोहम्मद जुनेद खान, रोयस्टन डायस

शेष भारत संघ - ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन (उपकर्णधार), साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक)*, इशान किशन (यष्टीरक्षक), मानव सुतार, सरांश जैन, प्रसिद्ध कृष्ण, मुकेश कुमार, यश दयाल*, रिकी भुई, शाश्वत रावत, खलील अहमद, राहुल चहर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.