T20 World Cup: निवृत्तीवरून माघार, थेट कर्णधार ! ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी विंडिजचा संघ जाहीर

Dottin named in West Indies squad : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी वेस्ट इंडिजच्या महिला संघात डिएंड्रा डॉटिनची निवड करण्यात आली आहे.
Diandra Dottin
Diandra Dottinesakal
Updated on

Deandra Dottin comes out of retirement: दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मागील महिन्यात ती मागे घेणाऱ्या डिएंड्रा डॉटिनला आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वेस्ट इंडिज संघाची कॅप्टन केलं गेलं आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी वेस्ट इंडिजच्या महिला संघाची घोषणा करण्यात आली. महिलांच्या ट्वेंटी-२० त सर्वात जलद शतक झळकावणाऱ्या डॉटिनने २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

"आमच्या संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचे मिश्रण आहे. आम्ही डॉटिनला परत खेळताना पाहण्यासाठी उत्सुक आहोत," असे क्रिकेट वेस्ट इंडिजचे (CWI) अध्यक्ष किशोर शॅलो यांनी संघ घोषणेनंतर सांगितले.

Diandra Dottin
Team India Update: भारतीय संघात पुरेशी संधी नाही मिळाली, गोलंदाजाने निवृत्तीची वाट धरली

जूनमध्ये हेली मॅथ्यूजच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेत शेवटची ट्वेंटी-२० मालिका जिंकल्यानंतर वेस्ट इंडिज महिला संघात एकूण चार बदल करण्यात आले आहेत. डॉटिन व्यतिरिक्त अश्मिनी मुनिसार, मँडी मँग्रू आणि अनकॅप्ड नेरिसा क्राफ्टन यांचा संघात समावेश केला गेला आहे. चेरी ॲन-फ्रेझर, रशदा विल्यम्स, शबिका गजनबी आणि केट विल्मोट यांना वर्ल्ड कप संघामधून वगळण्यात आले आहे.

वेस्ट इंडिज ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघ - हेली मॅथ्यूज (कर्णधार), शेमाइन कॅम्पबेले, आलिया ॲलेने, ऍफी फ्लेचर, अश्मिनी मुनिसार, चेडियन नेशन, चिनेल हेन्री, डिएंड्रा डॉटिन, करिश्मा रामहारक, मँडी मँग्रू,नेरिसा क्राफ्टन, कियाना जोसेफ, शास्मिलिया कॉनेल, स्टाफानिया टेलर, झैदा जेम्स.

Diandra Dottin
LLC 2024 Auction: Shikhar Dhawan, ख्रिस गेल गुजरात संघाकडून खेळणार; धवल कुलकर्णी ठरला सर्वात महागडा खेळाडू

स्पर्धेचे वेळापत्रक ( Full Schedule)

३ ऑक्टोबर, गुरुवार - बांगलादेश विरुद्ध स्कॉटलंड, शारजाह

३ ऑक्टोबर, गुरुवार - पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, शारजाह

४ ऑक्टोबर, शुक्रवार - दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज, दुबई

४ ऑक्टोबर, शुक्रवार - भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुबई

५ ऑक्टोबर, शनिवार - बांगलादेश विरुद्ध इंग्लंड, शारजाह

५ ऑक्टोबर, शनिवार - ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका, शारजाह

६ ऑक्टोबर, रविवार - भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई

६ ऑक्टोबर, रविवार - वेस्ट इंडिज विरुद्ध स्कॉटलंड, दुबई

७ ऑक्टोबर, सोमवार - इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, शारजाह

८ ऑक्टोबर, मंगळवार - ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड, शारजाह

९ ऑक्टोबर, बुधवार - दक्षिण आफ्रिका विरुद्ध स्कॉटलंड, दुबई

९ ऑक्टोबर, बुधवार - भारत विरुद्ध श्रीलंका, दुबई

१० ऑक्टोबर, गुरुवार - बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज, शारजाह

११ ऑक्टोबर, शुक्रवार - ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, दुबई

१२ ऑक्टोबर, शनिवार - न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका, शारजाह

१२ ऑक्टोबर, शनिवार - बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका, दुबई

१३ ऑक्टोबर, रविवार - इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड, शारजाह

१३ ऑक्टोबर, रविवार - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, शारजा

१४ ऑक्टोबर, सोमवार- पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, दुबई

१५ ऑक्टोबर, मंगळवार - इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, दुबई

१७ ऑक्टोबर, गुरुवार - उपांत्य फेरी १, दुबई

१८ ऑक्टोबर, शुक्रवार - उपांत्य फेरी २, शारजाह

२० ऑक्टोबर, रविवार - फायनल, दुबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.