चाहत्याचा दिल्ली ते रांची तब्बल १२०० किमी प्रवास; पण MS Dhoniची भेट झालीच नाही

MS Dhoni: भारतीय माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी नेहमीच चर्चेच्या अग्रस्थानी असतो. धोनीला पुन्हा एकदा नव्या कारणासाठी सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
MS Dhoni
MS Dhoniesakal
Updated on

MS Dhoni Fan heart-break moment: क्रिकेटर्स आणि चाहत्यांमधीले अनेक मजेशीर व अनोखे किस्से आपल्याला पहायला मिळतात. भारतीय माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्याचा एक असाच किस्सा समोर येत आहे. धोनीच्या चाहत्याने त्याला पाहण्यासाठी दिल्ली ते रांची १२०० किमी सायकल प्रवास केला आहे. या चाहत्याचे हे धोनीप्रेम पाहून नेटकरी अचंबित झाले आहेत.

एम एस धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होवून ४ वर्ष पू्र्ण झाली आहेत. तरीही तरुणांमधील एम एस धोनीची क्रेझ अजून कायम आहे. बांगलादेशविरूद्ध सामन्यात विराटच्या १५ चाहत्याने त्याला पाहण्यासाठी ५७ किमीचा सायकल प्रवास केल्याचे पहायला मिळाले. त्याप्रमाणेच धोनीचा हा चाहता धोनीला पाहण्यासाठी दिल्लीपासून १२०० किमी सायकल प्रवास करून रांची ला एम एस धोनीच्या घरापाशी आला. पण पुढे जे घडले ते वाचून तुम्ही थक्क व्हाल.

MS Dhoni
कसं काय, कर्जत-जामखेडकरांनो! Rohit Sharma ची मराठीत 'बोलं'दाजी; वर्ल्ड कप विजयाची आठवण

धोनीचा 'डाय-हार्ट फॅन' गौरव कुमार रांचीला आला खरा परंतु त्याच्या आवडत्या क्रिकेपटूला भेटू शकला नाही. एम एस धोनीच्या रांचीमधील त्याच्या आलिशान फार्महाऊसबाहेर गौरव तळ ठोकून होता. परंतु धोनी त्याच्या चाहत्याला काही भेटू शकला नाही. गौरव कुमारने सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो इथपर्यंत कसा पोहोचला हे सांगितले आहे.

एमएस धोनीचा हा चाहता जवळपास आठवडाभर फार्महाऊसच्या गेटवर थांबला आणि धोनीची एक झलक पाहण्यासाठी बाहेर तंबू टाकून तिथेच झोपायचा. धोनीला त्याने गेटमधून बाहेर येताना दोनदा पाहिले, पण धोनीने त्याला पाहिले नाही. त्यामुळे चाहत्याची धोनी सोबत भेट काही झाली नाही. त्यामुळे धोनीला नेटकऱ्यांद्वारे ट्रोल केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.