Rohit Sharma, Virat Kohli यांनी आणखी एक वर्ष खेळायला हवं होतं, पण...; दिलीप वेंगसरकर यांचं स्पष्ट मत, गौतम गंभीरकडून अपेक्षा

Team India New Head Coach : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर राहुल द्रविड याचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आणि मंगळवारी या पदावर BCCI ने गौतम गंभीरच्या नावाची घोषणा केली.
vengsarkar on gautam gambhir
vengsarkar on gautam gambhirsakal
Updated on

Indian Team Head Coach Gautam Gambhir : रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) च्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आयसीसी स्पर्धेतील ११ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवला. दक्षिण आफ्रिकेला नमवून भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ ( T20 WC) जिंकला. भारतीयांना अविस्मरणीय अनुभव दिल्यानंतर विराट कोहली ( Virat Kohli), रोहित व रवींद्र जडेजा यांनी एकामागून एक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे त्यांचे चाहते दुखावले असले तरी हा भारतीय क्रिकेटमधील स्थित्यंतराचा योग्य काळ असल्याचे मत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर ( Dilip Vengsarkar ) यांनी व्यक्त केले.

vengsarkar on gautam gambhir
Sunil Gavaskar: 'जेव्हा मुलं माझ्या हिरोला भेटतात...!', गावसकरांच्या 75 व्या वाढदिवशी रितेश देशमुखने शेअर केला 'तो' Video

''क्रिकेटमध्ये स्थित्यंतर नित्याचेच आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर विराट कोहली, रोहित शर्मा व रवींद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० मधून निवृत्ती जाहीर केली. या खेळांडूची रिक्त झालेली जागा भरणे अवघड आहे. हे सर्व अव्वल दर्जाचे खेळाडू आहेत. रोहित-विराट यांनी योग्यवेळी निवृत्ती घेतली. हे दोघं अजूनही एक वर्ष खेळू शकले असते. पण, कारकीर्दिच्या शिखरावर हे खेळाडू ट्वेंटी-२०तून निवृत्त झाले. ही पोकळी भरणे थोडे अवघड जाणार आहे. मात्र, त्यासाठी युवा पिढी सज्ज आहे. ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, लोकेश राहुल आहे. अशा खेळाडूंना संघातील त्यांचे स्थान भक्कम करण्याची, ही योग्य वेळ आहे,''असे मत वेंगसरकर यांनी 'सकाळ डिजीटल'शी बोलताना व्यक्त केले.

vengsarkar on gautam gambhir
Shahid Afridi : "बाबर आझमला जितक्या संधी मिळाल्या की..." आफ्रिदीच्या वक्तव्याने पाकिस्तानी क्रिकेटमध्ये उडाली खळबळ

राहुल द्रविडसारखा संयमी, शांत मुख्य प्रशिक्षकाचे जाणे आणि गौतम गंभीरसारख्या आक्रमक ( काहीसा तापट) प्रशिक्षकाची निवड होते, हा ट्रान्झॅक्शन तुम्ही कसा पाहता? यावर वेंगसरकर म्हणाले, ''गौतम गंभीर अनुभवी खेळाडू आहे, बरेच वर्ष भारताकडून खेळला आहे. आयपीएलमध्ये त्याने नुकतेच KKR ला ट्रॉफी जिंकून दिली आहे. त्यामुळे त्याचा अनुभव हा भारतालाही अनेक मालिका आयसीसी स्पर्धा जिंकून देईल, अशी अपेक्षा आहे. त्याच्याकडे प्रशिक्षणाचा फारसा अनुभव नसला तरी तो खेळाडूंनी नाळ जाणतो. त्याला माहित्येय कोणत्या खेळाडूचा केव्हा व कुठे चांगल्या पद्धतीने वापर करता येईल. तो युवा व अनुभवी खेळाडूंना सोबत घेऊन जाणारा कोच आहे आणि हे त्याने KKR सोबत असताना दाखवले आहे.''

vengsarkar on gautam gambhir
Rahul Dravid: राहुल द्रविडला मानलं! BCCIची 'ही' पैशांची खास ऑफर चक्क नाकारली, काय घडलं नेमकं?

खेळाडू म्हणून पाहिलेला गंभीर आणि प्रशिक्षक म्हणून गंभीर, यातला फरक तुम्ही कसा सांगाल? गौतम गंभीर खेळाडू म्हणून जसा होता, तसाच तो प्रशिक्षक म्हणून दिसतोय. त्याच्यातली जिद्द, जिंकण्याची महत्त्वकांक्षा, भूक कायम आहे. त्यामुळे आगामी स्पर्धांमध्ये त्याच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया आणखी उंच भरारी घेईल, अशी आशा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.