विराटनं आता देशांतर्गत क्रिकेट खेळायला हवं! माजी सहकाऱ्याचा किंग कोहलीला सल्ला

Dinesh Karthik advice to Virat Kohli : फिरकीविरुद्ध विराट कोहलीचा संघर्ष सुरूच आहे आणि न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत त्याला १ व १७ धावाच करता आल्या. पुणे कसोटी पराभवासह भारताने किवीविरुद्ध ३ सामन्यांची कसोटी मालिका गमावली आहे.
viratkohliranji
viratkohliranjiesakal
Updated on

Virat Kohli should play domestic cricket - विराट कोहली शेवटचा देशांतर्गत क्रिकेट सामना केव्हा खेळला होता, हे आठवतंय का? २०१२ मध्ये तो दिल्लीकडून शेवटचा रणजी सामना खेळला होता. २०२४ मध्ये दिल्लीच्या रणजी संघासाठीच्या संभाव्य खेळाडूंमध्ये त्याचे नाव होते, परंतु तो खेळला नाही. पण, आता त्याने पुन्हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याची गरज व्यक्त केली जात आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात विराटचा स्पिनर्ससमोर संघर्ष सुरू आहे आणि तो अडखळतोय. पुणे कसोटी पराभवामुळे भारताला १२ वर्षांनंतर घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमवावी लागली आहे. या कसोटीत विराटला दोन इनिंग्जमध्ये १ व १७ धावा करता आल्या आहेत. डावखुरा फिरकीपटू मिचेल सँटनरने त्याला दोन्ही डावांत बाद केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.