Dinesh Karthik MS Dhoni Apology: भारताचा माजी यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक याने काही दिवसांपूर्वी भारताच्या ऑल फॉरमॅटमधील सर्वोत्तम ११ खेळाडूंची टीम जाहीर केली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या टीममध्ये भारताचे वर्ल्ड कप विजेते कर्णधार कपिल देव व महेंद्रसिंग धोनी यांचे नाव नव्हते. धोनीला संघातून वगळणाऱ्या कार्तिकला चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. पण, आता कार्तिकने एका चॅट शोमध्ये या मागचं कारण समजावून सांगताना चाहत्यांची माफी मागितली आहे.
कार्तिकने सांगितले त्यानुसार प्लेइंग इलेव्हनची निवड करताना धोनीचं नाव विसरला होता आणि तो व्हिडिओ पल्बिश केल्यानंतर त्याला याची जाणीव झाली. ४३ वर्षीय कार्तिकने त्यानंतर चाहत्यांची माफी मागितली आहे. धोनी हा सर्वोत्तम क्रिकेटपटू असल्याचे तो म्हणाला.
''भाई लोग बडा गलती हो गया... माझ्याकडून मोठी चूक झाली. ही खरच खूप मोठी चूक होती. तो एपिसोड आल्यानंतर याची मला जाणीव झाली. ही प्लेइंग इलेव्हन निवडत असताना अनेक गोष्टी आजूबाजूला घडत होत्या. मी यष्टिरक्षकाची निवड करायलाच विसरलो. राहुल द्रविड माझ्या संघात होता, त्यामुळे लोकांना असं वाटलं की तो किपिंग करेल. पण, खरं सांगायचं तर मी राहुल द्रविडची पार्ट टाईम यष्टिरक्षक म्हणून निवड केली नव्हती,''असे कार्तिकने स्पष्ट केले.
कार्तिकने मे २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केले. भारताच्या सर्वोत्तम एकादश संघात महेंद्रसिंग धोनी असायलाच हवा आणि त्याच्याकडे या संघाचे नेतृत्व हवे, असे मतही कार्तिकने व्यक्त केले.
''तुम्हाला यावर विश्वास बसेल का? मी एक स्वतः यष्टिरक्षक असूनही माझ्या प्लेइंग इलेव्हनमध्ये यष्टिरक्षकाची निवड करण्यास विसरलो. ही खूप मोठी चूक होती. इतना बडा मिस्टेक... माझ्याकडून ती व्हायला नको होती. मी माझ्याकडून हे स्पष्ट करू इच्छितो की, धोनी हा कोणत्याही फॉरमॅटच्या संघात फिट बसतो. तो फक्त भारताचाच नव्हे, तर जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे.''
''मी आधी जाहीर केलेल्या संघात बदल करता आला, तर मी एक बदल नक्की करेन. थाला धोनी सातव्या क्रमांकावर असेल आणि तो या संघाचा कर्णधारही असेल. त्यात काहीच शंका नाही,'' हेही कार्तिक म्हणाला.
दिनेश कार्तिकची प्लेइंग इलेव्हन - वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, युवराज सिंग, रवींद्र जडेजा, आर अश्विन, अनिल कुंबळे, जसप्रीत बुमराह, झहीर खान; १२ वा खेळाडू - हरभजन सिंग.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.