Dinesh Karthik on Tamil Nadu Coach Ranji Trophy : रणजी उपांत्य सामन्यात तमिळनाडूचा मुंबईकडून डावाने पराभव झाला आणि त्यांचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी कर्णधार साई सुदर्शनला जबाबदार धरले. प्रशिक्षकांनी अशाप्रकारे कर्णधाराला टार्गेट केल्यामुळे निराश झालेला तमिळनाडूचा माजी कर्णधार दिनेश कार्तिकने कुलकर्णी यांच्यावर टीका केली.
वांद्रे कुर्ला संकुलातील शरद पवार अकादमीत उपांत्य फेरीचा हा सामना तीन दिवसांत संपला. या सामन्याची नाणेफेक पहिल्या दिवशी सकाळी नऊ वाजता झाली, तेव्हाच आम्ही हा सामना गमावला होता, अशी टीका सुलक्षण कुलकर्णी यांनी करताना कर्णधार साई सुदर्शनला जबाबदार धरले.
खेळपट्टीवर चांगलेच हिरवे गवत होते. त्यामुळे नाणेफेक जिंकली तर प्रथम गोलंदाजी निवड, असे मी साई सुदर्शनला सांगितले होते, सकाळी नऊ वाजता झालेली नाणेफेक त्याने जिंकलीही; परंतु स्वतःचाच विचार करताना त्याने प्रथम फलंदाजी स्वीकारली. त्यामुळे निराश झालेल्या कुलकर्णी यांनी सामना संपल्यानंतर आपली ही नाराजी जाहीरपणे मांडली. पहिल्या दिवशी उपाहारापर्यंत तमिळनाडूने पाच फलंदाज गमावले आणि तेथूनच संघाचा पराभव निश्चित होत गेला.
मी मुंबईतील खेळाडू आहे. येथील परिस्थिती, हवामान आणि खेळपट्टीचे स्वरूप मला माहीत आहे म्हणून मी नाणेफेक जिंकल्यावर प्रथम गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला होता, असे कुलकर्णी यांनी सांगितले. संघातील अशाप्रकारचे मतमत्तांतर जाहीरपणे सांगून कर्णधाराला बळीचा बकरा करण्याची सुलक्षण कुलकर्णी यांचीही कृती निषेधार्ह आहे, असे कार्तिक यांनी ‘एक्स’वरून म्हटले आहे.
अंगठा खाली दर्शवणारे पाच इमोजी टाकून कार्तिकने तीव्र नाराजी व्यक्त केली. कार्तिक हा तमिळनाडूचा माजी कर्णधार राहिलेला आहे. अशाप्रकारे तुम्ही कर्णधाराला जबाबदार धरू शकत नाही. सात वर्षानंतर तमिळनाडूचा संघ रणजी उपांत्य फेरीत आणण्यात साई सुदर्शन याचा मोलाचा वाटा आहे, असे म्हणत कार्तिकने साई सुदर्शनची पाठराखण केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.