IND vs BAN 1st Test : Shakib Al Hasanचं 'काळा' धागा चघळण्यामागचं मॅजिक; दिनेश कार्तिकनं उलगडलं लॉजिक

India lead by 308 runs: भारताने पहिल्या डावात ३०८ धावांची आघाडी घेतली आहे. बांगलादेशचा पहिला डाव १४९ धावांत गुंडाळला गेला.
Shakib Al Hasan.
Shakib Al Hasan.esakal
Updated on

India vs Bangladesh 1st Test Marathi Updates Shakib Al Hasan: बांगलादेश क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन फलंदाजी करताना हेल्मेटला चिकटलेला 'काळा' धागा चावत असल्याचे दिसून आले. पहिल्या डावात बांगलादेशच्या चार विकेट्स पडल्यानंतर शाकिब फलंदाजीला आणि दोन चौकार ठोकत आपल्या खेळीची सुरुवात केली. पण, चर्चा मात्र त्याच्या काळ्या धागा चघळण्याची झाली. Dinesh Karthik ने त्यामागचं लॉजिक उलगडले..

भारताच्या पहिल्या डावातील ३७६ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा पहिला डाव १४९ धावांवर गडगडला. भारताने दुसऱ्या डावात ३ बाद ८१ धावा करून आघाडी ३०८ धावांपर्यंत वाढवली आहे. पण, बांगलादेशच्या डावात शाकिब फलंदाजी करत असताना काळा धागा चघळताना दिसला. समालोचक आणि प्रेक्षक दोघांनाही शाकिबच्या या कृतीचे कुतूहल वाटले. नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर शाकिबचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले.

भारताचा माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने समालोचन करताना शाकिबच्या या सवयीमागील कारण स्पष्ट केले. "शाकिबला डोळ्यांची समस्या आहे आणि त्याने लंडनमध्ये नेत्रचिकित्सकाचा सल्लाही घेतला होता. चेंडूवर नजर स्थीर ठेवण्यासाठी शाकिब धागा चावतो, जेणेकरून त्याचे डोके सरळ राहण्यास मदत होते. ग्लोबल ट्वेंटी-२० कॅनडा लीगदरम्यानही तो जर्सी चावताना दिसला होता," अशी माहिती बांगलादेशचा माजी कर्णधार तमीम इक्बालने दिल्याचे कार्तिकने सांगितले.

आर अश्विन ( ११३) आणि रवींद्र जडेजा ( ८६) यांनी ७व्या विकेटसाठी १९९ धावा जोडल्या. त्याआधी यशस्वी जैस्वाल ( ५६) व ऋषभ पंत ( ३९) यांनी संघाला आधार दिला होता. भारताने पहिल्या डावात ३७६ धावा केल्या. बांगलादेशच्या हसन महमूदने पाच विकेट्स घेतल्या. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात अप्रतिम चेंडूवर इस्लामला त्रिफळा उडवला. त्यानंतर अन्य गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी करून बांगलादेशचा पहिला डाव १४९ धावांवर गुंडाळला. जसप्रीतने ४, सिराज, आकाश व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.


ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.