Dinesh Karthik India'a all time playing XI: भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीगमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे आणि राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीच्या संघातून तो SAT20 मध्ये खेळणार आहे. समालोचन करणारा कार्तिक हा आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज प्रशिक्षक म्हणूनही काम पाहणार आहे. दरम्यान, कार्तिकने त्याची भारताचा सर्वकालीन महान प्लेइंग इलेव्हन संघ जाहीर केला आहे. त्याच्या संघात विराट कोहली, रोहित शर्मा आणि सचिन तेंडुलकर यांचा समावेश आहे, परंतु महेंद्रसिंग धोनी व कपिल देव या वर्ल्ड कप विजेत्या कर्णधारांना स्थान दिलेले नाही.
कार्तिकने त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सध्या खेळत असेलेल्या ५ खेळाडूंसह ७ माजी खेळाडूंना स्थान दिले आहे आणि १२वा खेळाडू म्हणूनही त्याने माजी खेळाडूचीच निवड केली आहे. त्याच्या संघात पाच फलंदाज, तीन अष्टपैलू आणि १ फिरकीपटू व दोन जलदगती गोलंदाज आहेत.
महान फलंदाज सचिन तेंडुलकरला त्याने सलामीला स्थान दिलेले नाही. कार्तिकच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रोहित शर्मा व वीरेंद्र सेहवाग हे सलामीवीर आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर राहुल द्रविड, चौथ्या क्रमांकावर सचिन व पाचव्या क्रमांकावर विराट कोहली आहे. त्यानंतर युवराज सिंग, रवींद्र जडेजा व आर अश्विन हे फिरकी अष्टपैलू खेळाडू आहेत. महान फिरकीपटू अनिल कुंबळे संघात आहे आणि जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह व झहीर खान हेही संघात आहेत.
''या संघात प्रत्येकाला फिट करणे मलाच अवघड झाले आहे. मी सलामीसाठी वीरू आणि रोहित यांची निवड केली आहे. तिन्ही फॉरमॅटसाठी ही परफेक्ट जोडी आहे. तिसऱ्या क्रमांकावर राहुल, त्यानंतर सचिन, विराट असा क्रम आहे. सहाव्या क्रमांकासाठी निवड करणे आव्हानात्मक होते. पण, युवराजची निवड केली. सातव्या क्रमांकावर रवींद्र जडेजा, आठव्या क्रमांकावर आर अश्विन खेळेल.. त्यांतर कुंबळे, जसप्रीत व झहीर असा क्रम मी ठेवेन,''असे कार्तिक म्हणाला.
तो पुढे म्हणाला,''१२ वा खेळाडू म्हणून मी हरभजन सिंगला निवडेन. अनेक खेळाडूंना मी मिस केले. त्यात गौतम गंभीर हेही नाव आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये सर्वांचा समावेश करणे माझ्यासाठी अवघड होते. त्यामुळे ही माझी सर्व फॉरमॅटसाठीची सर्वकालीन प्लेइंग इलेव्हन आहे.''
दिनेश कार्तिकची प्लेइंग इलेव्हन - वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, युवराज सिंग, रवींद्र जडेजा, आर अश्विन, अनिल कुंबळे, जसप्रीत बुमराह, झहीर खान; १२ वा खेळाडू - हरभजन सिंग.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.