Mumbai Indians कडून १८ कोटी मिळावे, एवढी हार्दिक पांड्याची पात्रता आहे का? वाचा कोणी केलं हे विधान...

IPL Retention : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नुकतेच आयपीएल २०२५ ते २०२७ साठीची नियमावली जाहीर केली. त्यापैकी एक नियम हा आयपीएल २०२५ साठी होणाऱ्या ऑक्शनसाठी महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे फ्रँचायझीला ६ खेळाडूंना कायम राखता येणार आहे....
HardikPandya
HardikPandyaesakal
Updated on

IPL Retention Mumbai Indians Hardik Pandya : BCCI ने रिटेन्श नियम जाहीर केल्यानंतर चाहत्यांना उत्सुकता लागली आहे ती फ्रँचायझीच्या निर्णयाची. प्रत्येक फ्रँचायझीला त्यांच्या सध्याच्या संघातील सहा खेळाडूंना कायम राखण्याची परवानगी बीसीसीआयने दिली आहे. पण, या सहा खेळाडूंसाठी बीसीआयने विशिष्ट बजेट ठेवला आहे. त्यानुसार पहिल्या व चौथ्या क्रमांकावर रिटेन करण्यात येणाऱ्या खेळाडूंना प्रत्येकी १८ कोटी फ्रँचायझीला द्यावे लागणार आहे. मुंबई इंडियन्सच्या रिटेन केलेल्या खेळाडूंमध्ये कर्णधार हार्दिक पांड्या हा पहिल्या पसंतीचा खेळाडू असेल, असा अंदाज व्यक्त केला जातोय.. पण, हार्दिक पांड्याला १८ कोटी किंमत मिळावी, एवढी त्याची पात्रता आहे का? असा सवाल दिग्गजाने केला आहे.

सनरायझर्स हैदराबादचे माजी प्रशिक्षक आणि माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू टॉम मूडी ( Tom Moody) यांनी हार्दिकला मुंबई इंडियन्सकडून मिळणाऱ्या १८ कोटी रक्कमेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. हार्दिकला तुम्ही १८ कोटी देऊन संघात कायम राखणार का, असा सवाल त्यांनी केला आहे.

रिटेन्शनसाठीच्या किमती...

  • पहिल्या क्रमांकाच्या रिटेन खेळाडूला १८ कोटी

  • दुसऱ्या क्रमांकाच्या रिटेन खेळाडूला १४ कोटी

  • तिसऱ्या क्रमांकाच्या रिटेन खेळाडूला ११ कोटी

  • चौथ्या क्रमांकाच्या रिटेन खेळाडूला १८ कोटी

  • पाचव्या क्रमांकाच्या रिटेन खेळाडूला १४ कोटी

  • सहाव्या क्रमांकावर अनकॅप्ड खेळाडूसाठी ४ कोटी

HardikPandya
IPL Retention Auction Explainer : आयपीएल खेळा, पण Conditions Apply..! BCCI च्या नवीन नियमांचा 'गुंता' सोप्या भाषेत समजून घ्या

मुंबई इंडियन्स आयपीएल २०२५ साठी हार्दिक, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांना कायम ठेवण्याची शक्यता अधिक आहे. मूडी यांच्यामते जसप्रीत बुमराह व सूर्यकुमार यादव यांना प्रत्येकी १८ कोटी देऊन रिटेन करायला हवं, तर हार्दिकसाठी १४ कोटी ठिक आहेत. १८ कोटी रक्कम मोजणारा खेळाडू हा मॅचविनर असायला हवा आणि तो नियमित खेळणारा हवा.

''आयपीएलच्या शेवटच्या आवृत्तीत ज्या प्रकारे गोष्टी घडल्या होत्या, मागील ६-१२ महिन्यांत घडलेल्या गोष्टींमुळे रोहित शर्माचा थोडासा भ्रमनिरास झाला असेल, असे मला वाटते. मी बुमराह व सूर्यकुमार साठी प्रत्येकी १८ कोटी मोजेन आणि हार्दिकला १४ कोटीच्या ब्रॅकेटमध्ये ठेवेन. हा निर्णय त्याच्यावरच सोडेन किंवा त्याची कामगिरी, फॉर्म व फिटनेस याकडे लक्ष असेल. जेव्हा या गोष्टींचा विचार केला जाईल, तेव्हा खरंच हार्दिक पांड्या १८ कोटीसाठी पात्र ठरेल का? तो त्याला न्याय देईल का? जेव्हा तुम्ही १८ कोटी एखाद्या खेळाडूसाठी मोजता, तेव्हा तुम्हाला त्याच्याकडून मॅच विनिंग खेळी अपेक्षित असते आणि ती नियमित असायला हवी. मागील पर्वात हार्दिकला चांगली कामगिरी करता आलेली नव्हती. फिटनेस आणि परफॉर्मन्स याही गोष्टीत तो संघर्ष करताना दिसला,''असे मूडी म्हणाले.

HardikPandya
BCCI Income: IPL मुळे खेळाडू श्रीमंत, बोर्डाची बंपर कमाई; पण क्रिकेटला काय मिळाले?

हार्दिक पांड्या सध्या बांगलादेशविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी तयारी करतोय. आयपीएलच्या मागील पर्वात त्याने २१६ धावा केल्या होत्या आणि ११ विकेट्स घेतल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.