श्रीलंका विरुद्ध भारत संघात बुधवारी (७ ऑगस्ट) वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना कोलंबोला खेळवला जात आहे. या सामन्यात भारतासमोर श्रीलंकेने २४८ धावांचे लक्ष्य ठवेले आहे. दरम्यान, या सामन्यात ४९ व्या षटकात एक गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले.
झाले असे की श्रीलंकेचा संघ फलंदाजी करत असताना ४९ व्या षटकात कुलदीप यादव गोलंदाजी करत होता. यावेळी त्याने टाकलेल्या शेवटच्या चेंडूवर स्ट्राईकवर असणाऱ्या महिश तिक्षणाने पुढे येऊन शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण तो चूकला. यावेळी पंतने चेंडू पकडला आणि स्टंपवरील बेल्स उडवले. सुरुवातीला तिक्षणा यष्टीचीत झाल्याचे वाटले.
भारतीय संघानेही विकेटचे सेलीब्रेशन केले. तिक्षणालाही तो वेळेत क्रिजमध्ये पोहचला नसल्याचे वाटले आणि तो माघारी जायला निघाला. पण पंचांनी टीव्ही अंपायरकडे याबाबत रिव्ह्यूची मागणी केली. त्यानंतर रिप्लेमध्ये दिसले की पंतने स्टंपवरील बेल्स उडवण्याआधीच तिक्षणाची बॅट क्रिजमध्ये पोहचली होती. त्यामुळे तो नाबाद असल्याचे स्पष्ट दिसले.
पण पुन्हा यावेळी एक गोंधळ झाला टीव्ही अंपायरने त्याला नाबाद देण्याऐवजी आधी बाद असं दिसलं, पण चूक लक्षात येताच लगेचच नाबाद दिलं. बाद आणि मग नाबाद असं मोठ्या स्क्रिनवर पाहून पहिले प्रेक्षकांबरोबरच श्रीलंकेचा मुख्य प्रशिक्षक सनथ जयसूर्याही गोंधळला. पण झालेली घटना पाहून त्यालाही हसू आवरता आले नाही.
दरम्यान, तिक्षणा जीवदानानंतर अखेरच्या षटकात २ चेंडू खेळण्याची संधी मिळाली, ज्यात त्याने तीन धावा काढल्या.
दरम्यान, समन्याबद्दल सांगायचे झाले, तर श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ७ बाद २४८ धावा केल्या. श्रीलंकेकडून अविष्का फर्नांडोने १०२ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह ९६ धावा केल्या. यष्टीरक्षक कुशल मेंडिसने ८२ चेंडूत ५९ धावांची खेळी केली. याशिवाय पाथम निसंकाने ६५ चेंडूत ४५ धावांची खेळी केली. त्याचबरोबर कामिंडू मेंडिसने २३ धावांची नाबाद खेळी केली.
भारताकडून गोलंदाजी करताना रियान परागने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.