Hardik Pandya बद्दल सहकाऱ्यांचे मत ठिक नाही? अजित आगरकरच्या 'त्या' विधानावरून नवी चर्चा

Hardik Pandya T20I captaincy : रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर हार्दिक पांड्याकडे ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व जाईल, असे वाटले होते. पण, गौतम गंभीर व अजित आगरकर यांनी सूर्यकुमार यादवची निवड केली.
Ajit Agarkar on Hardik Pandya Captaincy
Ajit Agarkar on Hardik Pandya Captaincysakal
Updated on

Indian team leave for Sri Lanka : श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ आज रवाना झाला. नवीन मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने ( Gautam Gambhir) श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली. त्याच्यासोबत यावेळी निवड समिती प्रमुख अजित आगरकरही ( Ajit Agarkar) उपस्थित होता. यावेळी पत्रकारांकडून पहिला प्रश्न हा हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) विषयी असेल हे निश्चित होते आणि त्याला आगरकरने उत्तर दिले. त्याने दिलेल्या उत्तराने सर्वांचे समाधानही झाले, मात्र त्या विधानाच्या 'बिटविन दी लाईन'ने नव्या चर्चेला तोंड फुटले.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघात बरेच बदल पाहायला मिळत आहेत. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पदावर कायम राहण्यास नकार दिला. रोहित शर्मा, विराट कोहली व रवींद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तून निवृत्ती घेतली. BCCI ने गौतम गंभीर याची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली, तर ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे सोपवले गेले. शिवाय हार्दिक पांड्याकडून ट्वेंटी-२० व वन डे संघाचे उप कर्णधारपद काढून घेत शुभमन गिलकडे सोपवले गेले. वैयक्तिक आयुष्यात संघर्ष करत असलेल्या हार्दिकसाठी हा खूप मोठा धक्का होता.

Ajit Agarkar on Hardik Pandya Captaincy
Gautam Gambhir on Virat Kohli: ''TRP साठी चांगलं आहे...!'' विराटसोबतच्या नात्यावर गौतमचं रोखठोक उत्तर

हार्दिक पांड्याकडून उप कर्णधारपदाची जबाबदारी काढून घेण्यामागे अन् त्याला कर्णधार न करण्यामागे, काहीतरी कारण आहेत. याची चर्चा रंगली होतीच. त्यात निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी यामागचं कारण स्पष्ट केले. आगरकर म्हणाला, हार्दिकला कर्णधार न बनवण्यामागे त्याची तंदुरुस्ती हे प्रमुख कारण आहे. तो सातत्याने दुखापतींशी संघर्ष करताना यापूर्वी दिसला आहे. आम्हाला कर्णधारपदासाठी असा खेळाडू हवा होता, जो तंदुरुस्त असेल आणि दुखापतीच्या कारणामुळे संघाबाहेर त्याला बसायला लागता कामा नये. त्यामुळे सूर्यकुमारची निवड केली गेली.

हे सांगत असताना आगरकरच्या एका वाक्याने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. फिटनेस हा फॅक्टर होताच, परंतु हा निर्णय घेण्यापूर्वी आम्ही ड्रेसिंग रुममधील खेळाडूंचे फिडबॅक घेतले आणि त्यानंतर सूर्यकुमारला ही जबाबदारी दिली गेली, असे आगरकर म्हणाला. आता सहकाऱ्यांचे हार्दिकबद्दलचे मत चांगले नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Ajit Agarkar on Hardik Pandya Captaincy
Gautam Gambhir Press Conference: हार्दिक पांड्याला कर्णधार का नाही केलं? अजित आगरकरनं स्पष्ट सांगितलं

भारताचा वन डे संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), शुभमन गिल ( उप कर्णधार), विराट कोहली, लोकेश राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलिल अहमद, हर्षित राणा.

भारताचा ट्वेंटी-२० संघ - सूर्यकुमार यादव ( कर्णधार), शुभमन गिल ( उप कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलिल अहमद, मोहम्मद सिराज.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.