Duleep Trophy 2024-25 India B vs India D: श्रेयस अय्यरचा सुमार फॉर्म दुलीप क्रिकेट करंडकातील अखेरच्या फेरीतही कायम राहिला. राहुल चहरच्या गोलंदाजीवर श्रेयस नितीशकुमार रेड्डीकरवी झेलबाद झाला. अवघ्या पाच चेंडूंना सामोरा जाणारा श्रेयस शून्यावरच बाद झाला.
दुलीप करंडकात त्याच्या बॅटमधून ९, ५४, ०, ४१ आणि ० अशाच धावा निघाल्या. भारत ड संघाचे कर्णधारपदही त्याच्याकडे आहे; मात्र भारत ड संघाचेही या स्पर्धेतील जेतेपदाचे आव्हान संपुष्टात आले आहे. भारत ड संघाने पहिल्या दिवसअखेरीस पाच बाद ३०६ धावा फटकावल्या.
देवदत्त पडिक्कल (५० धावा), के. एस. भारत (५२ धावा), रिकी भुई (५६ धावा) व संजू सॅमसन (नाबाद ८९ धावा) यांनी भारत ड संघाकडून अर्धशतकी खेळी करताना भारत ब संघाविरुद्ध आपली चमक दाखवली.