Duleep Trophy 2024: वाढदिवसाच्या दिवशीच Shubman Gill च्या संघाचा पराभव! इंडिया बी संघाला मिळाले ६ गुण

India A vs India B: दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीत इंडिया बी संघाने शुभमन गिल कर्णधार असलेल्या इंडिया ए संघाविरुद्ध दणदणीत विजय मिळवला.
Duleep Trophy 2024-25 | India A vs India B
Duleep Trophy 2024-25 | India A vs India BSakal
Updated on

India B won by 76 Runs against India A: दुलीप ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धा सध्या सुरू असून पहिली फेरी पार पडली आहे. पहिल्या फेरीतील दोन्ही सामने अत्यंत रोमांचक झाले. पहिल्या फेरीच्या चौथ्या दिवशी (८ सप्टेंबर) इंडिया बी संघाने शुभमन गिल कर्णधार असलेल्या इंडिया ए संघाला ७६ धावांनी पराभूत केले.

विशेष म्हणजे कर्णधार गिलचा रविवारी २५ वा वाढदिवस आहे, मात्र त्याला याच दिवशी पगराभवाचा सामना करावा लागला आहे. यामुळे अभिमन्यू ईश्वरन कर्णधार असलेल्या इंडिया बी संघाला विजयाचे ६ गुण मिळाले आहेत.

यापूर्वी पहिल्या फेरीच्या तिसऱ्या दिवशी ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वा इंडिया सी संघाने इंडिया डी संघाला ४ विकेट्सने पराभूत केले होते. त्यामुळे इंडिया सी संघाकडेही ६ गुण आहेत.

Duleep Trophy 2024-25 | India A vs India B
Ruturaj Gaikwad च्या नेतृत्वाखालील संघाने श्रेयस अय्यरच्या टीमला नमवले; Duleep Trophy त महत्त्वाचे ६ गुण कमावले
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.