Duleep Trophy Schedule: स्टार खेळाडू भिडणार! जाणून घ्या दुलीप ट्रॉफीचं संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

Duleep Trophy 2024-25 Timetable: सप्टेंबरमध्ये दुलीप ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होत असून यामध्ये शुभमन गिल, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड आणि अभिमन्यू ईश्वरन यांना कर्णधारपद देण्यात आले आहे. या स्पर्धेचं वेळापत्रक जाणून घ्या.
Duleep Trophy Schedule
Duleep Trophy ScheduleSakal
Updated on

Duleep Trophy 2024-25 Schedule: भारतातील देशांतर्गत क्रिकेटच्या २०२४-२५ हंगामाला सप्टेंबरमध्ये सुरुवात होणार आहे. दुलीप ट्रॉफी या प्रथम श्रेणीच्या स्पर्धेपासून या हंगामाला सुरुवात होत आहे. ५ सप्टेंबरपासून दुलीप ट्रॉफी खेळवली जाणार असून यासाठी बीसीसीआयने बुधवारी पहिल्या फेरीसाठी ए, बी, सी आणि डी संघांची घोषणा केली आहे.

या स्पर्धेत अनेक मोठे खेळाडू खेळताना दिसणार आहेत. १९ सप्टेंबरपासून भारताची बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका सुरु होणार आहे. त्यादृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची मानली जात आहे.

दरम्यान, पहिली फेरीतील एक सामना बंगळुरूला आणि दुसरा सामना अनंतपूरला होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीतील सामने अनंतपूरलाच होणार आहेत.

Duleep Trophy Schedule
Duleep Trophy Teams: रोहित शर्मा, विराट कोहली यांनी का फिरवली पाठ? हे आहे कारण
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.