Shashwat Rawat Century: अंशुल कंबोज व विजयकुमार वैशाख यांच्या प्रभावी गोलंदाजीसमोर भारत क संघाने भारत अ संघाची अवस्था ५ बाद ३६ धावा अशी केली होती. मात्र शाश्वत रावत याने नाबाद १२२ धावांची खेळी साकारताना भारत अ संघाचा डाव सावरला.
त्याच्यासह शम्स मुलानी याने ४४ धावांची मौल्यवान खेळी केली. भारत अ संघाने दुलीप करंडकातील अखेरच्या फेरीतील पहिल्या दिवसअखेरीस सात बाद २२४ धावा केल्या.
भारत अ संघाने आतापर्यंत सहा गुण कमवले आहेत. तसेच भारत क संघ ९ गुणांसह पहिल्या स्थानावर विराजमान आहे. त्यामुळे अजिंक्यपदासाठी या दोन संघांमधील लढत निर्णायक ठरू शकणार आहे. भारत क संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले.