DULEEP TROPHY UPDATES: मोहम्मद सिराज आजारी पडला, रवींद्र जडेजाची माघार; नेमकं घडतंय काय?

Duleep Trophy Cricket Latest Updates: दुलीप ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेला ५ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. भारतातील ही एक मानाची देशांतर्गत स्पर्धा आहे. यंदा या स्पर्धेत अनेक मोठे स्टार खेळाडू खेळताना दिसणार आहेत.
duleep trophy 2024
duleep trophy 2024esakal
Updated on

Duleep Trophy 2024-25 Updates revised squads:

५ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या राऊंडसाठी संघात बदल झाले आहेत. निवड समितीने आज संघात काही बदल असल्याचे जाहीर केले. जलदगती गोलंदाज नवदीप सैनी याची ब संघात एन्ट्री झाली आहे. मोहम्मद सिराज आजारी पडल्यामुळे तो खेळणार नाही, तर उम्रान मलिकच्या जागी क संघात गौरव यादवची निवड झाली आहे. उम्रानही आजारी पडला आहे आणि तोही सिराजसह दुलीप ट्रॉफीत खेळण्याची शक्यता कमी आहे.

अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याला ब संघातून रिलीज केले गेले आहे. ५ सप्टेंबरपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे आणि स्पर्धेतील सामने आंध्रप्रदेश व बंगळुरू येथे होतील.

duleep trophy 2024
Duleep Trophy Schedule: स्टार खेळाडू भिडणार! जाणून घ्या दुलीप ट्रॉफीचं संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

सुधारित संघ -

भारत अ - शुभमन गिल ( कर्णधार), मयांक अग्रवाल, रियान पराग, ध्रुव जुरेल ( यष्टिरक्षक), लोकेश राहुल, तिलक वर्मा, शिवम दुबे, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, खलील अहमद, आवेश खान, विद्वथ कवेरप्पा, कुमार कुशाग्र, शास्वत रावत

भारत ब - अभिमन्यू इश्वरन ( कर्णधार), यशस्वी जैस्वाल, सर्फराज खान, ऋषभ पंत, मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चहर, आर साई किशोर, मोहित अवस्थी, एन जगदीसन

भारत क - ऋतुराज गायकवाड ( कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल, सूर्यकुमार यादव, बी इंद्रजित, हृतिक शोकीन, मानव सुतार, गौरव यादव, वैशाक विजयकुमार, अंशूल खंबोज, हिमांशू चौहान, मयांक मार्कंडे, आर्यन जुयाल, संदीप वॉरियर्स

भारत ड - श्रेयस अय्यर ( कर्णधार), अथर्व तायडे, यश दुबे, देवजत्त पडिक्कल, इशान किशन, रिकी भूई, सारांश जैन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, तुषार देशपांडे, आकाश सेनगुप्ता, केएस भरत, सौरभ कुमार

नोट - नितीश कुमार रेड्डीचं दुलीप करंडक खेळणे हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.