भारत अ विरुद्ध भारत ड सामन्यात वातावरण तापलेले पाहायला मिळाले. शुभमन गिल बांगलादेश कसोटी मालिकेसाठी टीम इंडियात दाखल झाल्याने भारत अ संघाचे नेतृत्व मयांक अग्रवाल करतोय. पण, तो आज केवळ ७ धावा करून माघारी परतला, दुसरा सलामीवीर प्रथम सिंग ( ७) यालाही अपयश आले. रियान पराग व तिलक वर्मा यांनी संघाचा डाव सावरला होता. पण, अर्शदीप सिंगने सुरेख मारा केला आणि रियानला बाद केले. फलंदाजाला माघारी पाठवताच अर्शदीपने केलेलं सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरला आहे.
२१ धावांवर दोन विकेट्स गमावल्यानंतर तिलक आणि रियान यांनी भारत अ संघाला सावरले होते. रियानने मारलेला षटकार हा सोशल मीडियावर हिट ठरला. त्याने अर्शदीपच्या एका षटकात ४,४,०,४ असे फटके खेचून दम दाखवला होता. त्याने तिलकसह ४४ धावांची भागीदारी केली आणि भारत अ संघाला ३ बाद ६५ धावांपर्यंत पोहोचवले. पण, अर्शदीपने त्याच्या पुढच्या षटकात रियानला माघारी पाठवले. रियान २९ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ३७ धावांवर बाद झाला.
त्यानंतर सारांश जैन याने तिलकला ( १०) माघारी पाठवले. हर्षित राणाने पुढील षटकात शास्वत रावतची ( १५) विकेट घेऊन भारत अ संघाचा निम्मा संघ तंबूत पाठवला. यष्टीरक्षक कुमार कुशाग्रने चांगली खेळी केली होती, परंतु अर्शदीपने त्याला ( २८) बाद केले. शाम्स मुलानी व तनुष कोटियन या जोडीने संघाचा डाव सावरला आहे. मुलानीने अर्धशतक झळकावले. भारत अ संघाच्या ५६ षटकांत ६ बाद २०७ धावा झाल्या आहेत. मुलानी ५२, तर कोटियन ४० धावांवर खेळतोय.
दरम्यान, ऋतुराज गायकवाडच्या भारत क संघाने भारत ब संघाविरुद्ध ५३ षटकांत २ बाद २३० धावा केल्या आहेत. ऋतुराज पाय मुरगळल्यामुळे रिटायर्ड हर्ट झाला. बी साई सुदर्शन ( ४३) व रजत पाटीदार ( ४०) यांनी चांगली खेळी करून संघाला सावरले. त्यानंतर इशान किशन ( ८२ खेळतोय) व बाबा इंद्रजित ( ४६ खेळतोय ) यांची फटकेबाजी सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.