Duleep Trophy 2024: सर्फराझ, रिंकू सिंग अपयशी, मात्र भारत ब संघासाठी कर्णधार अभिमन्यूची शतकी झुंज

India B vs India C: दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धेत कर्णधाराच्या शतकानंतरही भारत ब संघाला तिसऱ्या दिवस अखेर ७ बाद ३०९ धावाच करता आल्या. त्यामुळे ऋतुराज गायकवाड कर्णधार असलेल्या भारत क संघाला मोठी आघाडी घेण्याची संधी आहे.
Abhimanyu Easwaran
Abhimanyu EaswaranSakal
Updated on

Duleep Trophy, India B vs India C: बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी शिबिरातील सरावापेक्षा सामना सरावाला प्राधान्य देणाऱ्या सर्फराझ खानला केवळ १६ धावा करता आल्या. तर आयपीएल स्टार रिंकू सिंगही अपयशी ठरला त्यामुळे दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेत भारत ब संघाला तिसऱ्या दिवस अखेर ७ बाद ३०९ धावाच करता आल्या.

भारत क संघाने आपल्या पहिल्या डावात ५२५ धावाांचा डोंगर उभा करुन आपली स्थिती भक्कम केली आहे. त्यांच्याकडे अजून २१६ धावांची आघाडी आहे. उद्या सामन्याचा अखेरचा दिवस असल्यामुळे पहिल्या डावाची आघाडी गुणांसाठी महत्वाची ठरणार आहे.

Abhimanyu Easwaran
Duleep Trophy: ध्रुव जुरेलचा भारी कारनामा! MS Dhoniच्या २० वर्षे जुन्या विक्रमाशी केली बरोबरी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.