Duleep Trophy 2024 | Yash Dubey Run-Out
Duleep Trophy 2024 | Yash Dubey Run-OutSakal

Duleep Trophy 2024: गेम झाला ना भाऊ! दुबे बॉल चूकवायला गेला अन् बॅटला लागून स्वतःच रनआऊट झाला, मुंबईच्या गोलंदाजाची भारी चपळाई

Yash Dubey Run-Out: दुलीप ट्रॉफीमध्ये इंडिया डी संघाकडून १०० धावांची भागीदारी केल्यानंतर यश दुबे विचित्र पद्धतीने धावबाद झाला.
Published on

Duleep Trophy 2024, India A vs India D: क्रिकेटमध्ये धावा पळताना बऱ्याचदा चुका होऊ शकतात आणि या चुकांचे परिणाम एखादा फलंदाज धावबाद होण्यात होतो. कधीकधी फलंदाज काहीशा विचित्र पद्धतीनेही धावबाद होतो. असाच काहीसा प्रकार दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीत पाहायला मिळाला.

दुसऱ्या फेरीत इंडिया ए विरुद्ध इंडिया डी संघात सामना सुरू आहे. या सामन्यात इंडिया डी संघाकडून खेळणारा यश दुबे नॉन-स्ट्रायकरवर धावबाद झाला.

झाले असे की रविवारी या स्पर्धेचा अखेरचा दिवस आहे आणि इंडिया ए संघाने इंडिया डी संघासमोर ४८८ धावांचे भलेमोठे आव्हान विजयासाठी ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना शनिवारी इंडिया डी संघाने दुसऱ्या डावात अथर्व तायडेची विकेट लवकर गमावली होती. पण त्यानंतर यश दुबे आणि रिकी भूई यांनी डाव सावरला होता.

Duleep Trophy 2024 | Yash Dubey Run-Out
मुंबई इंडियन्सचा गोलंदाज Duleep Trophy मध्ये चमकला; ऋतुराजाच्या संघासाठी ८ विकेट्स घेत इतिहास रचला
Loading content, please wait...