Duleep Trophy: भारत अ संघाकडे त्रिशतकी आघाडी, ऋतुराजच्या संघापुढे विजेतेपद मिळवण्यासाठी तगडे आव्हान

India A vs India C: भारत अ संघाने ऋतुराज गायकवाड कर्णधार असलेल्या भारत क संघाविरुद्ध मोठी आघाडी तिसऱ्या दिवस अखेरपर्यंत मिळवली आहे.
India C Team
India C TeamX/BCCIDomestic
Updated on

Duleep Trophy 2024, India A vs India C: पहिल्या डावात ६३ धावांची आघाडी घेणाऱ्या भारत अ संघाने दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेत भारत क संघाविरुद्धच्या लढतीत आपली स्थिती अधिक भक्कम करताना दुसऱ्या डावात सहा बाद २७० धावांपर्यंत मजल मारली.

सामन्याचा उद्या (२२ सप्टेंबर) अखेरचा दिवस आहे आणि भारत अ संघाकडे आता ३३३ धावांची आघाडी आहे. उद्या ते आपला डाव कधी घोषित करतात, त्यावर भारत क संघासाठी निर्णायक विजयाचे भवितव्य अवलंबून असेल.

सध्या भारत क संघाकडे विजेतेपद मिळवण्याची सर्वाधिक संधी आहे. परंतु, या सामन्याच्या निकालावर अखेर विजेतेपद कोणाला मिळणार हे निश्चित होईल.

India C Team
Duleep Trophy: श्रेयस अय्यरला सूर सापडला, ठोकलं वेगवान अर्धशतक; रिकी भुईच्याही आक्रमक ९० धावा

आजच्या (२१ सप्टेंबर) तिसऱ्या दिवशी सात बाद २१७ धावांवरून डाव सुरू करणाऱ्या भारत क संघासाठी आघाडी घेणे कठीणच होते, तरीही त्यांचे पुढचे फलंदाज केवळ १७ धावाच अधिक करू शकले. त्यामुळे ६३ धावांची आघाडी मिळाल्यानंतर भारत अ संघाने आपली पकड भक्कम करण्यास सुरुवात केली.

कर्णधार मयांक अगरवाल ३४ धावांचे योगदान देऊन बाद झाल्यानंतर रियान पराग आणि शाश्वत रावत यांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून डाव सावरला. पराग ७३ धावांवर बाद झाला तर पहिल्या डावातील शतकवीर शाश्वत रावतने ५३ धावांची खेळी केली.

India C Team
Duleep Trophy: सॅमसनच्या शतकाला कॅप्टन ईश्वरनचे शतकी प्रत्युत्तर; मुशीर खानसह सूर्यकुमारही अपयशी

संक्षिप्त धावफलक :

भारत अ संघ, पहिला डाव : २९७ आणि दुसरा डाव : ६ बाद २७० (मयांत अगरवाल ३४, तिलक वर्मा १९, रियान पराग ७३, शाश्वत रावत ५३, कुमार कुशाग्र खेळत आहे ४०, अंशुल कंबोज १६-३-५२-२, गौरव यादव १४-०-६०-२, मानव सुतार २०-०-७५-२).

भारत क संघ, पहिला डाव : २३४ (बाबा इंद्रजित ३४, अभिषेक पॉरेल ८२, पुलकित नारंग ४१, आवेश खान १६-३-६४-३, आकिब खान १३-१-४३-३, शम्स मुलानी १०-१-३०-२)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.