Duleep Trophy 2024: तिलक वर्मा-प्रथम सिंग यांची शानदार शतके; भारत अ संघाला विजयाची संधी

India A vs India D end of 3rd Day: दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धेत प्रथम सिंग आणि तिलक वर्मा यांच्या शतकांमुळे भारत अ संघाला भारत ड संघाविरुद्धच्या विजयाची संधी निर्माण झाली आहे.
Pratham Singh - Tilak Varma Century
Pratham Singh - Tilak Varma CenturySakal
Updated on

Duleep Trophy 2024 India A vs India D end of 3rd Day : प्रथम सिंग आणि तिलक वर्मा यांच्या शतकांमुळे मोठी आघाडी घेणाऱ्या भारत अ संघाला ड संघाविरुद्धच्या दुलीप करंडक क्रिकेट सामन्यात निर्णायक विजयाची संधी निर्माण झाली आहे. उद्या सामन्याचा शेवटचा दिवस असून भारत अ संघाला नऊ विकेटची गरज आहे.

पहिल्या डावात १०७ धावांची घेणाऱ्या भारत अ संघाने आपल्या दुसऱ्या डावात ३ बाद ३८० धावा करुन डाव घोषित केला आणि भारत ड संघासमोर ४८८ धावांचे आव्हान दिले. तिसऱ्या दिवस अखेर त्यांची १ बाद ६२ अशी अवस्था केली. उद्या अखेरच्या दिवशी कमीत कमी ९० षटकांच्या खेळात भारत ड संघाला विजयासाठी ४२६ धावा करण्याचे फारच कठीण आव्हान आहे.

Pratham Singh - Tilak Varma Century
Duleep Trophy: ध्रुव जुरेलचा भारी कारनामा! MS Dhoniच्या २० वर्षे जुन्या विक्रमाशी केली बरोबरी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.