Duleep Trophy 2024, India B vs India D: दुलीप करंडक स्पर्धेत दोन डावांत भोपळा न फोडू शकणाऱ्या श्रेयस अय्यरने आज (२१ सप्टेंबर) वेगवान अर्धशतकी खेळी केली; पण रिकी भुईच्या वेगवान नाबाद ९० धावांच्या खेळीमुळे भारत ड संघाने भारत ब संघावर वर्चस्व कायम ठेवले आहे.
पहिल्या डावात ६७ धावांची आघाडी घेणाऱ्या भारत ड संघाने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाअखेर पाच बाद २४४ धावा केल्या. पहिल्या डावात शानदार फलंदाजी करणारा देवदत्त पडिक्कल आणि श्रीकर भरत आज मात्र अपयशी ठरले; मात्र रिकी भुईने १० चौकार आणि तीन षटकारांसह ८७ चेंडूंत नाबाद ९० धावांची खेळी केली.
या डावात भारत ड संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस आला. त्याने एकदिवसीय सामन्यास साजेशी अशी ४० चेंडूंत ५० धावांची खेळी केली. त्यानंतर पहिल्या डावातील शतकवीर संजू सॅमसनने ४५ धावा फटकावल्या.
सामन्याचा उद्याचा (२२ सप्टेंबर) अखेरचा दिवस असून भारत ड संघाकडे ३११ धावांची आघाडी आहे. त्यामुळे भारत ब संघासाठी निर्णायक विजयाची संधी फारच कमी आहे.
भारत ड संघ पहिला डाव : ३४९ आणि दुसरा डाव : ५ बाद २४४ (रिकी भुई खेळत आहे ९० - ८७ चेंडू, १० चौकार, ३ षटकार, श्रेयस अय्यर ५० - ४० चेंडू, ७ चौकार, १ षटकार, संजू सॅमसन ४५ - ५३ चेंडू, ५ चौकार, २ षटकार, मुकेश कुमार १३-०-८०-३, नवदीप सैनी ११-२-४०-२)
भारत ब संघ, पहिला डाव : २८२ (अभिमन्यू ईस्वरन ११६, वॉशिंग्टन सुंदर ८७, अर्शदीप सिंग १८-४-५०-३, आदित्य ठाकरे १९-३-५२-२, सौरभ कुमार १९.२-०७३-५)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.