Duleep Trophy 2024 Video: श्रेयस अय्यर शायनिंग मारत आला अन् शुन्यावर आऊट झाला, संजू सॅमसनही स्वस्तात माघारी परतला

Shreyas Iyer and Sanju Samson Wicket Video: दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत इंडिया डी संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि यष्टीरक्षक संजू सॅमसन स्वस्तात आऊट झाले.
Shreyas Iyer | Duleep Trophy 2024
Shreyas Iyer | Duleep Trophy 2024Sakal
Updated on

India A vs India D Match: दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धेत अनंतपूर येथे इंडिया ए विरुद्ध इंडिया डी संघात सामना होत आहे. या सामन्यात दोन्ही संघात पहिल्या दिवसापासून चुरस पाहायला मिळत आहे.

मयंक अगरवाल कर्णधार असलेल्या इंडिया ए संघाला पहिल्या डावात अवघ्या २९० धावा करता आल्या. पण त्याच्या प्रत्युत्तरात इंडिया डी संघाचेही फलंदाज विशेष काही दाखवू शकले नाहीत.

अवघ्या ५२ धावांवर इंडिया डीच्या संघानेही ४ विकेट्स गमावल्या होत्या. यामध्ये इंडिया डी संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन यांच्याही विकेट्सचा समावेश आहे.

Shreyas Iyer | Duleep Trophy 2024
Duleep Trophy: ध्रुव जुरेलचा भारी कारनामा! MS Dhoniच्या २० वर्षे जुन्या विक्रमाशी केली बरोबरी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.