मयंक अगरवालच्या टीमचा मोठा विजय! श्रेयस अय्यरच्या संघाची सलग दुसऱ्या पराभवासह Duleep Trophy जिंकण्याची संधीही हुकली

India A vs India D: दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या फेरीत मयंक अगरवाल कर्णधार असलल्या इंडिया ए संघाने श्रेयस अय्यर नेतृत्व करत असलेल्या इंडिया डी संघाचा दारुण पराभव केला आहे.
India A Team | Duleep Trophy
India A Team | Duleep TrophySakal
Updated on

Duleep Trophy 2024, India A vs India D: दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धेतील दुसरी फेरी रविवारी संपली. दुसऱ्या फेरीत अनंतपूरममधील रुरल डेव्हलपमेंट ट्रस्ट स्टेडियमवर इंडिया ए विरुद्ध इंडिया डी संघात सामना झाला. या सामन्यात मयंक अगरवाल कर्णधार असलेल्या इंडिया ए संघाने १८६ धावांनी मोठा विजय मिळवला. यासह इंडिया ए संघाला ६ महत्त्वाचे गुणही मिळाले आहेत.

मात्र श्रेयस अय्यर कर्णधार असलेल्या इंडिया डी संघाला मात्र सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यांमुळे दोन सामन्यांनंतरही त्यांच्या खात्यात शून्य गुण आहेत. अशात इंडिया डी संघाची आता दुलीप ट्रॉफी जिंकण्याची संधीही हुकली आहे.

या सामन्यात इंडिया डी समोर इंडिया ए संघाने ४८८ धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंडिया डी संघाला दुसऱ्या डावात ८२.२ षटकात सर्वबाद ३०१ धावाच करता आल्या.

India A Team | Duleep Trophy
मुंबई इंडियन्सचा गोलंदाज Duleep Trophy मध्ये चमकला; ऋतुराजाच्या संघासाठी ८ विकेट्स घेत इतिहास रचला
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.