Duleep Trophy Musheer Khan : १९ वर्षीय मुशीर खानने दुलीप ट्रॉफीची पहिली फेरी गाजवली. भारत ब संघातून खेळणारे ऋषभ पंत व यशस्वी जैस्वाल अपयशी ठरले असताना मुशीरने संधीचं सोनं केलं. त्यानं शुभमन गिलच्या भारत अ संघाविरुद्ध १८१ धावांची खेळी करून महान फलंदाज सचिन तेंडुकरचा विक्रम मोडला.
मुशीरला नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या नवदीप सैनीची ( Navdeep Saini) साथ मिळाली. या दोघांनी आठव्या विकेटसाठी २०४ धावांची विक्रमी भागीदारी केली. दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील ८ व्या क्रमांकासाठीची ही सर्वोत्तम भागीदारी ठरली.
204 - मुशीर खान आणि नवदीप सैनी विरुद्ध इंडिया ए, बंगळुरू, 2024
197 - अभिषेक नायर आणि रमेश पोवार विरुद्ध उत्तर विभाग, ग्वाल्हेर, 2010
178 - बाबा इंद्रजित-विजय गोहिल विरुद्ध इंडिया ब्लू, कानपूर, 2017
146 - दिनेश कार्तिक आणि मरीपुरी सुरेश विरुद्ध सेंट्रल झोन, बंगळुरू, 2009
145 - निखिल चोप्रा आणि शक्ती सिंग विरुद्ध सेंट्रल झोन, गुवाहाटी, 1999
मुशीरने पहिल्या दिवशी शतक झळकावले होते आणि आज त्याचे द्विशतकात रुपांतर करेल असे वाटले होते. भारत ब संघाची अवस्था ७ बाद ९४ अशी झाली होती आणि या परिस्थितीत मुशीर मैदानावर उभा राहिला. त्याने नवदीपसोबत २०४ धावा जोडल्या. मुशीरने ३७३ चेंडूंत १६ चौकार व ५ षटकारांसह १८१ धावा चोपल्या. चौकार-षटकारांनीच त्याने २१ चेंडूंत ९४ धावा जोडल्या.
कुलदीप यादवने २९९ धावांवर भारत ब संघाला आठवा धक्का दिला. नवदीप १२७ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारांसह ५३ धावांवर खेळतोय. दरम्यान मुशीरने महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मोठा रेकॉर्ड मोडला. तेंडुलकरने दुलीप ट्रॉफीत पदार्पणात १५९ धावांची खेळी केली होती आणि मुशीरने १८१ धावा केल्या. या दमदार कामगिरीनंतर मुशीरला आगामी बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियात संधी मिळते का याची उत्सुकता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.