Rishabh Pant Duleep Trophy 2024 : अपघातानंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ऋषभ पंतला दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात अपयश आले. भारताच्या आगामी बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळण्याचा ऋषभचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी दुलीप ट्ऱॉफीत त्याची कामगिरी कशी होते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या गाडी अपघातातून बचावलेल्या ऋषभ पंतने व्हाइटबॉल क्रिकेटमध्ये जोरदार पुनरागमन केले, परंतु त्यानंतर तो प्रथमच रेड बॉल क्रिकेट खेळायला मैदानावर उतरला आहे. सलग चार दिवसांच्या क्रिकेट सामन्यात तो कसा खेळतो याकडे निवड समितीचे बरकाईने लक्ष असणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ऋषभ पंत हा हुकमी खेळाडू समजला जातो. यष्टीरक्षणाबरोबर फलंदाजीसाठी त्याची तंदुरुस्ती तपासली जाईल.
भारत ब संघाकडून खेळणारा ऋषभ पंत भारत अ संघाविरुद्ध फेल गेला. प्रथम फलंदाजीला आलेल्या भारत ब संघाला यशस्वी जैस्वाल ( ३०) व कर्णधार अभिमन्यू इश्वरन ( १३) यांनी चांगली सुरूवात करून दिली होती. आवेश खानने पहिला धक्का दिला. सर्फराज खानही ९ धावा करून आवेशच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. ५९ चेंडूंत ६ चौकारांसह ३० धावा करणाऱ्या यशस्वीला खलिल अहमदने माघारी पाठवले.
आता ऋषभ पंत मैदानावर आला आणि त्याने एक चौकारही खेचला. परंतु आकाश दीपने त्याला शुभमन गिलच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. ऋषभ १० चेंडूंत ७ धावा करून परतला. नितिश कुमार रेड्डीही भोपळा न फोडताच आकाश दीपच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. मुशीर खान ( २३*) खिंड लढवतोय आणि भारत ब संघाच्या ५ बाद ८९ धावा केल्या आहेत.
ऋषभ पंतने ३३ कसोटी सामन्यांत ४३.६७च्या सरासरीने २२७१ धावा केल्या आहेत. त्यात १ शतक व ११ अर्धशतकं आहेत. त्याने ११९ झेल व १४ स्टम्पिंग केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.