हे काय झालं! Ruturaj Gaikwad दोन चेंडू खेळून रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतला, कारण काय...

Duleep Trophy 2024 - दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीला आजपासून सुरूवात झाली आणि भारत ब विरुद्ध भारत क सामन्यात दोन चेंडू खेळून ऋतुराज Retired Hurt झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
Ruturaj Gaikwad
Ruturaj Gaikwadesakal
Updated on

Why Ruturaj Gaikwad retired hurt? दुलीप ट्रॉफपीच्या दुसऱ्या फेरीला आजपासून सुरुवात झाली आणि गुरुवारी अनंतपूर येथील सामन्यात भारत क संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड दोन चेंडू खेळून तंबूत परतल्याने सर्वांना आश्चर्य वाटले. तो बाद झाला नाही, परंतु रिटायर्ड हर्ट झाला.

फलंदाजीला आल्यानंतर ऋतुरानने सामन्याच्या पहिल्या चेंडूवर भारत ब संघाचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर चौकार मारला आणि पुढच्या चेंडूवर तो रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतला. महाराष्ट्राचा फलंदाज मैदानाबाहेर कशामुळे गेला, हे मात्र अद्याप अस्पष्ट होते. पण, हाती आलेल्या नियमानुसार त्याचा पाय मुरगळला आहे आणि त्याची दुखापत गंभीर नाही. मध्य प्रदेशच्या रजत पाटीदारने ऋतुराजच्या जागी नंतर फलंदाजीला आला.

Ruturaj Gaikwad
बाबो! ४२५ धावांची विक्रमी भागीदारी, २७९ धावांची वैयक्तिक विक्रमी खेळी; जबरदस्त मॅच

अनंतपूर येथील मागील फेरीत ऋतुराजच्या संघाने भारत ड संघावर रोमहर्षक विजय मिळवला होता. अटीतटीच्या लढतीत २३६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऋतुराजने भारत क साठी ४८ चेंडूंत ४६ धावांची खेळी केली होती. आज भारत ब संघाविरुद्ध तो २ चेंडूंत ४ धावा करून रिटायर्ड हर्ट झाला. बी साई सुदर्शन ( २९) व रजत पाटीदार ( १४) यांनी संघाला १३ षटकांत बिनबाद ५२ धावांपर्यंत पोहोचवले आहे.

गेल्या डिसेंबरमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधाराला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर अंगठ्याच्या दुखापतीमुळे माघार घ्यावी लागले होती. त्यानंतर २७ वर्षीय फलंदाजाला पुनरागमन करता आले नाही. ऋतुराजने ऑक्टोबर २०१६ मध्ये महाराष्ट्रासाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि तेव्हापासून त्याने सहा शतकं व १० अर्धशतकांसह दोन हजाराहून अधिक धावा केल्या आहेत.

Ruturaj Gaikwad
'दबंग' सचिन, 'बादशाह' युवराज, तर 'शेहनशाह'...! Gautam Gambhir ची भन्नाट उत्तरं Video Viral

दरम्यान, भारत अ विरुद्ध भारत ड सामना सुरू आहे. शुभमन गिल बांगलादेश कसोटी मालिकेसाठी टीम इंडियात दाखल झाल्याने भारत अ संघाचे नेतृत्व मयांक अग्रवाल करतोय. पण, तो आज केवळ ७ धावा करून माघारी परतला, दुसरा सलामीवीर प्रथम सिंग ( ७) यालाही अपयश आले. रियान पराग व तिलक वर्मा मैदानावर आहेत आणि भारत अ संघाच्या १३ षटकांत २ बाद ४९ धावा झाल्या आहेत. भारत ड संघासाठी विध्वत कावेरप्पाने दोन्ही विकेट मिळवल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.