Duleep Trophy 2024: ऋतुराजच्या टीमने मिळवला 'पहिला नंबर'! इंडिया बी विरुद्ध सामना ड्रॉ अन् आता ट्रॉफीपासून फक्त एक विजय दूर

India B vs India C: दुलीप ट्रॉफीमध्ये दुसऱ्या फेरीत ऋतुराज गायकवाड कर्णधार असलेल्या इंडिया सी संघाचा इंडिया बी संघाविरुद्धचा सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे आता इंडिया सी संघ सध्या पाँइंट्स टेबलमध्ये अव्वल क्रमांकावर आहे.
India C Team | Duleep Trophy | Ruturaj Gaikwad
India C Team | Duleep Trophy | Ruturaj GaikwadSakal
Updated on

Duleep Trophy 2024, India B vs India C: दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धेतील दुसरी फेरी रविवारी संपली. दुसऱ्या फेरीत इंडिया बी विरुद्ध इंडिया सी असा सामना सामना झाला. चौथ्या दिवसाच्या खेळानंतर हा सामना अनिर्णित राहिला आहे.

मात्र पहिल्या डावात आघाडी मिळवल्याने ऋतुराज गायकवाड कर्णधार असलेल्या इंडिया सी संघाला ३ गुण मिळाले आहेत, तर इंडिया बी संघाला केवळ १ गुण मिळाला आहे. यामुळे सध्या दुसर्‍या फेरीनंतर इंडिया सी संघ गुणतालिकेत ९ गुणांसह अव्वल क्रमांकावर आहे.

इंडिया सी संघाने पहिल्या सामन्यातही इंडिया डी संघाला पराभूत केले होते. त्यामुळे आता जर इंडिया सी संघाने तिसऱ्या सामन्यात इंडिया ए संघाला पराभूत केले, तर ते त्यांचं नाव विजेतेपदाच्या ट्रॉफीवर नक्कीच कोरतील. कारण तसं झाल्यास त्यांचे १५ गुण होतील. १५ गुणांपर्यंत इतर तीन संघ पोहचू शकत नाहीत.

India C Team | Duleep Trophy | Ruturaj Gaikwad
मयंक अगरवालच्या टीमचा मोठा विजय! श्रेयस अय्यरच्या संघाची सलग दुसऱ्या पराभवासह Duleep Trophy जिंकण्याची संधीही हुकली
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.