Duleep Trophy: अर्शदीपच्या ६ विकेट्स अन् श्रेयस अय्यरच्या संघाने चाखली विजयाची चव, पण फायदा होणार ऋतुराजच्या संघाला?

India B vs India D: दुलीप ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेतील तिसऱ्या आणि अखेरच्या फेरीत भारत ड संघाने भारत ब संघाविरुद्ध २५७ धावांनी मोठा विजय मिळवला.
Arshdeep Singh | India D Team
Arshdeep Singh | India D TeamSakal
Updated on

Duleep Trophy 2024, India B vs India D: दुलीप ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेतील तिसऱ्या आणि अखेरच्या फेरीत भारत ड संघाने भारत ब संघाविरुद्ध २५७ धावांनी मोठा विजय मिळवला. श्रेयस अय्यर कर्णधार असलेल्या भारत ड संघाचा हा या स्पर्धेतील पहिला विजय आहे.

त्यांना या आधी भारत अ आणि भारत क संघाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. या विजयामुळे आता भारत ड संघाचेही ६ गुण झाले आहेत. दरम्यान, या विजयामुळे ऋतुराज गायकवाड कर्णधार असलेल्या भारत क संघाला फायदा होऊ शकतो.

कारण भारत ड संघाने विजय निश्चित केले असल्याने भारत ब संघ ७ गुणांवरच कायम राहणार आहे. जर भारत ब संघाने विजय मिळवला असता किंवा पहिल्या डावातील आघाडीसह सामना अनिर्णित राखला असता, तर त्यांना पाँइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवून विजेतेपदाची दावेदारी सांगता आली असती.

पण आता ते दुसऱ्या क्रमांकावर कायम राहिले असल्याने त्यांची विजेतेपदाची संधी हुकली आहे. याशिवाय भारत ड संघही ६ गुणांवर कायम असल्याने त्यांनाही विजेतेपद जिंकता येणार नाही.

Arshdeep Singh | India D Team
WTC 2023-25 Points Table: भारताविरूद्धच्या पराभवानंतर बांगलादेशची घसरगुंडी, तर रोहितसेना कोणत्या क्रमांकावर?

आता विजेतेपदासाठी भारत क आणि भारत अ संघात सुरू असलेल्या सामन्यावर सर्वांची नजर आहे. जर या सामन्यात भारत क संघाने विजय मिळवला, तर ते विजेतेपदावर १५ गुणांसह हक्क सांगतील. पण जर त्यांना सामना अनिर्णित राखण्यात यश मिळाले, तर त्यांना एकच गुण मिळणार आहे, कारण या सामन्यात भारत अ संघाने पहिल्या डावात आघाडी मिळवली आहे.

या आघाडीमुळे सामना अनिर्णित राहिला, तर भारत अ संघाला ३ गुण मिळणार आहेत, तर भारत क संघाला एक गुण मिळणार आहे. पण हा एक गुणही भारत क संघाला विजेतेपद मिळवून देण्यास पुरेसा असणार आहे. कारण भारत क संघाचे सध्या ९ गुण असल्याचे एक गुण मिळाल्यानंतर त्यांचे १० गुण होतील.

तसेच भारत अ संघाला ३ गुण मिळाले, तरी ते ९ गुणांपर्यंतच पोहचणार आहेत. त्यामुळे भारत क संघ अव्वल क्रमांकावर कायम राहिल. मात्र, जर भारत क संघ सामना पराभूत झाला, तर भारत अ संघ विजेतेपद मिळवेल, कारण भारत क संघ ९ गुणांवर कायम राहिल, पण भारत अ संघ १२ गुण मिळून अव्वल स्थान मिळवेल.

Arshdeep Singh | India D Team
Ruturaj Gaikwad: फिल्डिंगमध्येही दिसला ऋतुचा 'राज', डाव्या हाताने भारी कॅच पकडत रियान परागला धाडलं माघारी

भारत ड संघाचा विजय

भारत ड संघाने भारत ब संघाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ८७.३ षटकात सर्वबाद ३४९ धावा केल्या. या डावात संजू सॅमसनने १०६ धावांची खेळी केली, तर देवदत्त पडिक्कल (५०), श्रीकर भारत (५२) आणि रिकी भूई (५६) यांनी अर्धशतके केली. भारत ब संघाकडून नवदीप सैनीने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर भारत ब संघाला पहिल्या डावात सर्वबाद २८२ धावाच करता आल्या. भारत ब संघाकडून कर्णधार अभिमन्यू ईश्वरनने ११६ धावांची खेळी केली. तसेच वॉशिंग्टन सुंदरने ८७ धावांची खेळी केली. भारत ड संघाकडून सौरभ कुमारने ५ विकेट्स घेतल्या. पहिल्या डावात ६७ धावांची आघाडी भारत ड संघाला मिळाली.

भारत ड संघाने रिकी भूईच्या ११९ धावांच्या शतकी खेळीसह आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या ५० धावांच्या वादळी धावांच्या खेळीसह दुसऱ्या डावात सर्वबाद ३०५ धावा करता आल्या. त्यामुळे त्यांनी भारत ब संघासमोर ३७३ धावांचे आव्हान ठेवले.

या आव्हानाचा पाठलाग करताना भारत ब संघ २२.२ षटकात सर्वबाद ११५ धावाच करता आल्या. नितीश रेड्डीने ४० धावांची झुंज दिली. मात्र भारत ड संघाकडून आर्शदीप सिंग आणि आदित्य ठाकरे यांच्या गोलंदाजीपुढे भारत ब संघाच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. आर्शदीप सिंगने ६ विकेट्स घेतल्या आणि आदित्यने ४ विकेट्स घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.