आग अन् किटाळ! भारतीय गोलंदाजाच्या वेगवान माऱ्याने स्टम्प्स उखडून फेकले; फलंदाज सैरभैर झाले, Video

Vijaykumar Vyshak : भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात वर्चस्व गाजवलेले पाहायला मिळतेय. गोलंदाजानी बांगलादेशचा निम्मा संघ ४० धावांवर तंबूत पाठवला आहे..
Vijaykumar Vyshak
Vijaykumar Vyshak esakal
Updated on

Duleep Trophy 2024 Vijaykumar Vyshak : भारत-बांगलादेश यांच्यात पहिला कसोटी सामना चेन्नईत सुरू आहे. भारताच्या पहिल्या डावातील ३७६ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशने ४० धावांत ५ फलंदाज गमावले आहेत. जसप्रीत बुमराह व आकाश दीप यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद सिराजनेही १ बळी टिपला. भारतीय गोलंदाज आंतरराष्ट्रीय कसोटी गाजवत असताना दुसरीकडे भारताचा विजयकुमार वैशाकने दुलीप ट्रॉफीत अफलातून कामगिरी केली आहे.

मयांक अग्रवालच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारत अ संघाचा डाव २९७ धावांवर गुंडाळला गेला. प्रथम सिंग, मयांक, तिलक वर्मा व रियान पराग हे एकेरी धावेवर माघारी परतले. अंशूल कंबोजने दोन्ही सलामीवीरांना बाद केले. ५ बाद ३६ धावांवरून भारत अ संघाला शाश्वत रावतने सावरले. त्याने २५० चेंडूंत १५ चौकारांच्या मदतीने १२४ धावांची खेळी केली. शाम्स मुलानी ( ४४) व आवेश खान ( ५१*) यांनी चांगले योगदान दिले. एम प्रसिद्धने ३४ धावा केल्या. विजयकुमारने शतकवीर शाश्वत व प्रसिद्ध यांचे उडवलेले त्रिफळे चर्चेचा विषय ठरत आहेत. विजयकुमारने ५१ धावांत ४ विकेट्स घेतल्या.

Vijaykumar Vyshak
IND vs BAN 1st Test: रोहितकडून Mohammad Siraj वर अन्याय, नेटिझन्स नाराज; पण, बांगलादेशला दिसले 'आकाश' Video

भारत क संघाची सुरुवात काही खास झाली नाही. कर्णधार ऋतुराज गायकवाड ( १७) व बी साई सुदर्शन ( १७) यांना आकिब खानने चतुराईने बाद केले. रजत पाटीदारही भोपळ्यावर आकिबच्या गोलंदाजीवर माघारी परतला. आवेश खानने इशान किशनला ( ५) त्रिफळाचीत करून भारत क संघाची अवस्था ४ बाद ४१ अशी केली.

बाबा इंद्रजित आणि अभिषेक पोरेल यांनी संघाचा डाव सावरला आहे आणि भारत क संघाने २५ षटकांत ४ बाद ९१ धावा केल्या आहेत.

Vijaykumar Vyshak
IND vs BAN 1st Test : Jasprit Bumrah चा चेंडू सोडण्याची चूक अन् बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल; रचले गेले ५ मोठे विक्रम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.