ENG vs AUS : ३४८ दिवसांनी ऑस्ट्रेलियाचा संघ वन डेत हरला, Harry Brook ने १९८५ सालचा विक्रम मोडला

ENG vs AUS 3rd ODI : ऑस्ट्रेलियाची वन डे सामन्यांतील विजयी मालिका अखेर खंडित झाली. वन डे वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलियाने सलग १४ सामने जिंकून विक्रम नोंदवला होता
Hary Brook
Hary Brookesakal
Updated on

England vs Australia 3rd ODI Harry Brook Century : हॅरी ब्रूकच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने तिसऱ्या वन डे सामन्यात बाजी मारली. वन डे क्रिकेटमधील ऑस्ट्रेलियाचा हा ३४८ दिवसानंतरचा पहिला पराभव ठरला. इंग्लंड दौऱ्यावरील पाच वन डे सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला डकवर्थ लुईस नियमानुसार ( DLS) ४६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

२०२३ च्या वन डे वर्ल्ड कपनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथमच वन डे सामन्यांत हरला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मागील सात वन डे सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर इंग्लंडचा हा पहिला विजय ठरला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा सलग १४ वन डे सामना जिंकण्याची मालिका संपुष्टात आली. सलग सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या पहिल्या दोन क्रमांकावर ऑस्ट्रेलियाच आहे. त्यांनी याआधी सलग २१ सामने जिंकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला आहे.

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद ३०४ धावा केल्या. स्टीव्हन स्मिथ ( ६४) व अॅलेक्स केरी ( ७७*) यांच्या अर्धशतकांना कॅमेरून ग्रीन ( ४२) व ग्लेन मॅक्सवेल ( ३०) व आरोन हार्डी ( ४४) यांनी साथ दिली. प्रत्युत्तरात इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर ११ धावांवर माघारीर परतले. विल जॅक्स ( ८४) व कर्णधार हॅरी ब्रूक ( ११०) यांनी दमदार खेळ केला.

ब्रूकने ९४ चेंडूंत १३ चौकार व २ षटकारांच्या मदतीने वन डे कारकीर्दितील पहिले शतक ठोकले. इंग्लंडने ३७.४ षटकांत ४ बाद २५४ धावा केल्या होत्या. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबवावा लागला. DLS नुसार इंग्लंडने ३७.४ षटकांत ४६ धावा अतिरिक्त ( २०९) केल्या होत्या आणि त्यामुळे त्यांना विजयी घोषित केले गेले.

चौथा कर्णधार

हॅरी ब्रूक हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डेत शतक करणारा इंग्लंडचा चौथा कर्णधार ठरला. यापूर्वी इयॉन मॉर्गन १२१ धावा ( सिडनी, २०१५), मिचेल अथेर्टन ११३* ( ओव्हल, १९९७) आणि डेव्हिड गोवर १०२ ( लॉर्ड्स, १९८५) यांनी असा पराक्रम केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()